नेशन न्यूज मराठी टीम.
नंदुरबार/प्रतिनिधी – राज्यात कुपोषित बालकांची संख्या 28 हजार असून त्यापैंकी 23 हजार बालके नंदुरबार जिल्ह्यात असून नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यूच्या प्रश्न गंभीर असून त्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी केला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण आणि बालमृत्यूची समस्या गंभीर असून जिल्हा रुग्णालयात असलेल्या सुविधा अपूर्ण आहेत जिल्हा रुग्णालयात असलेल्या लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात 20 जागांची कॅपॅसिटी असताना 84 बालक उपचार घेत असल्याचा गंभीर प्रकार आमदार पाडवी यांनी समोर आणला आहे जिल्हा रुग्णालयातील रिक्त पद आणि अपूर्ण सुविधा यामुळे जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण वाढला असल्याचा आरोपही पाडवी यांनी केला आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली जाण्यासाठी वेळ आहे मात्र आदिवासींच्या समस्या ऐकून घेण्यासाठी वेळ नसल्याचा आरोपही त्यांनी केला आदिवासींच्या समस्या सोडविण्यासाठी असलेल्या ट्रायबल अडवायजर कमिटीची बैठक पाच वर्षात झाली नसून या महिन्यात दोन वेळेस बैठकीसाठी वेळ देऊनही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे सरकार आदिवासींच्या प्रश्नांवर किती गंभीर आहे असा प्रश्नही पाडवी यांनी उपस्थित केला आहे.