नेशन न्यूज मराठी टीम.
सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्काची अवैधरीत्या हातभट्टीची विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील तीन ठिकाणी गावठी दारूच्या हातभट्ट्या उध्वस्त करून 14 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर सात लाख रुपयांची अवैधरित्या हातभट्टी दारू पथकाने जप्त केली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील सेवा तांडा, वडजी तांडा व उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची तांडा या परिसरातील अवैध हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर पहाटेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापे टाकले. मोहिमेत गावठी दारु निर्मितीसाठी आवश्यक 21,250 लिटर गुळमिश्रित रसायन, 100 लिटर हातभट्टी दारु व इतर साहित्य तसेच अन्य दोन ठिकाणी कारवाई करून सात लाख रू मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे अशी माहिती नितीन धार्मिक अधीक्षक सोलापूर उत्पादन शुल्क यांनी माध्यमांशी बोलताना दिली.त्याच बरोबर त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि अशा गावठी दारू, हातभट्ट्या, बनावट दारू यांची माहिती नागरिकांना असल्यास त्यांनी उत्पादन शुल्क विभागास कळवावे त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन नितीन धार्मिक अधीक्षक सोलापूर उत्पादन शुल्क विभाग यांनी दिले.