Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image कला/साहित्य लोकप्रिय बातम्या

बीड मध्ये रंगणार राज्य बालनाट्य स्पर्धा

नेशन न्यूज मराठी टीम.

बीड – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची महाराष्ट्र राज्य १८ व्या बालनाट्य  स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरु झाली आहे. त्या अनुषंगाने हि बालनाट्य स्पर्धा बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आज सोमवार दि. २१  ते २३ मार्च या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत संपन्न होत आहे. या स्पर्धेत एकूण १४ बालनाट्य सादर होणार आहेत. या स्पर्धेत सादर होणाऱ्या बाल  नाटकांचा आनंद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभिषण चवरे यांनी केले आहे.
अठराव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत यावर्षी अठराव्या महाराष्ट्र राज्य बाल नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दि.16 मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रात दहा केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत एकूण 211 बालनाट्य संस्था सहभाग घेणार आहेत. रंगभूमीला  उत्तम रंगकर्मीची कमतरता भासू नये आणि लहान वयातील कला कलाकारांमधील कलागुणांना उत्तेजन व प्रोत्सहान देऊन भावी काळात त्यांच्यामधून उत्तम कलाकार निर्माण व्हावेत या उद्देशाने महाराष्ट्र शासन बालनाट्य स्पर्धांचे आयोजन गेली सतरा वर्षांपासून करत आले आहे. या वर्षी 18 व्या वर्षात बालनाट्य स्पर्धा पोहोचली आहे. या स्पर्धेतील सर्व बालनाट्य विनामूल्य पाहता येणार आहेत. आपण या बालनाट्य स्पर्धेचा आस्वाद घेण्याकरिता बाल कलाकारांना प्रोत्साहित करण्याकरिता सर्व रसिक प्रेक्षकांनी दि. 21 ते 23 मार्च या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे उपस्थित राहावे. असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभिषण चवरे यांनी केले आहे.

सादर होणारे बालनाट्य
सोमवार दि. 21 मार्चला ठोंब्या ठोंबीची गोष्ट, डोंबारी, सावी, बफरींग, बालपण नको रे देवा मंगळवार दि 22 मार्चला क्षितीजाच्या पलीकडे,जीर्णोद्धार,आम्ही नाटक करीत आहोत,शोध अस्तित्वाचा, कोयत तर बुधवार दि. 23 मार्च रोजी  सावली, ड्रामेबाज, प्रायश्चित, कस्तुरी आदी बालनाट्य सकाळी ११ ते सायंकाळी  ४ या वेळेत सादर होणार  आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X