महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image राजकीय

नेवासा येथे एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचितचा पाठींबा

अहमदनगर/प्रतिनिधी – नेवासा-गेल्या आठ दिवसांपासून राज्यभरात एस .टी .कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून,आंदोलनाच्या भूमिकेमध्ये कर्मचारी वर्ग असताना सरकार उदासीनतेची भूमिका घेत आहे.एस.टी.कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना सहमती दर्शवत राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाला नेवासा येथे वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिला आहे.एसटी ही राज्याची जीवन वाहिनी असून,दररोज ६५ लाख जनतेला सेवा देण्याचे कार्य एसटी कर्मचारी करीत आहे,परंतु त्यांना अनेक महिन्यांपासून विना वेतन राहावे लागले असून त्यांना विविध सोयी सुविधांचा अभाव जाणवत आहे. आजपर्यंत ३५ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीला सहमती देत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने प्रभारी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी राज्यभरातील आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.

त्याच धर्तीवर नेवासा येथे सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव संजय सुखदान,जिल्हा उपाध्यक्ष विजय अंकल गायकवाड,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुमित मकासरे यांच्या नेतृत्वात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला असून पाठिंब्याचे पत्र नेवासा बसस्थानक प्रमुख यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले आहे.जाहीर पाठिंबा देते वेळी वंचित बहुजन आघाडीचे हरीश चक्रनारायण, उदय कर्डक, अजय त्रिभुवन,विशाल शिनगारे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×