नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
अहमदनगर/प्रतिनिधी– २ लाख ३१ हजार रुपये किंमतीचा २३ किलो गांजासह २ आरोपींना गजाआड करत श्रीरामपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.शिर्डीकडुन दिघीमार्गे श्रीरामपूर शहराकडे, पांढऱ्या रंगाची इंडीगो सी.एस.गाडी तुन विक्रीस बंदी असलेला गांजा घेऊन येत असल्याच्या, गुप्त माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व त्यांच्या टीमने,सुतगिरणी रेल्वे फाटक परिसरात सापळा रचून दोन आरोपीना ताब्यात घेतले.
त्यांच्या कडून २ लाख ३१ हजार रुपये किंमतीचा २३ किलो गांजा व एम. एच. ४४ बी. ९९९१ क्रमांकाची इंडीगो सी.एस.गाडी अशा एकूण. ६ लाख ८१ हजार ३०० रुपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी अस्लम यासीन मन्सुरी, वय वर्ष ४० व शाहरुख युनुस शेख, वय वर्ष २९ या दोघांना ताब्यात घेऊन. त्यांच्या विरोधात एन.डी.पी.एस. कायद्यांन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे यांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करुन आरोपींना ताब्यात घेतले.