नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा एरियल आर्मी यॉचिंग नोड यांनी ‘2022 ऑप्टिमिस्ट आशियाई आणि ओशनियन चॅम्पियनशिप’चे 13 ते 20 डिसेंबर या कालावधीत गिरगाव चौपाटी येथे आयोजन केले आहे. तब्बल 19 वर्षानंतर भारतात होणाऱ्या या स्पर्धांचा थरार मुंबईसह भारतवासियांना अनुभवता येणार आहे.
मुंबईला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले असून, 13 डिसेंबर रोजी स्पर्धकांची नोंदणी करण्यात येणार आहे. तर, 14 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. 19 डिसेंबरपर्यंत 10 शर्यतींमध्ये प्रतिदिन जास्तीत जास्त तीन फ्लीट शर्यती आयोजित केल्या जातील. या चॅम्पियनशीपचा समारोप 19 डिसेंबर रोजी ठाकर्स, चौपाटी येथे होईल.
महाराष्ट्र शासनाचा व केंद्र शासनाचा क्रीडा विभाग, याचिंग असोसिएशन ऑफ इंडिया (YAI) आणि नॅशनल ऑप्टिमिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया (NOAI) यांच्या सहकार्याने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा आशियाई आणि आशियाई महासागरातील सदस्य राष्ट्रांसाठी कॉन्टिनेंटल चॅम्पियनशिप आहे. आशियाई आणि ओशनिया प्रदेशातील 13 देशांतील 105 स्पर्धक या आठवडाभर चालणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. अर्जेंटिना, थायलंड, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, तुर्की, जपान, कॅनडा आणि भारतातील सुमारे 25 अधिकारी आंतरराष्ट्रीय ज्युरी/रेस मॅनेजमेंटमध्ये सहभागी असणार आहेत.
युवकांची ऊर्जा क्रीडा क्षेत्रासाठी उपयोगात यावी, चारित्र्यनिर्मिती, त्यांच्यात साहसाची भावना जागृत करणे आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांना सक्षम करणे जेणेकरून राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान लाभेल, हे या खेळाचे उद्दिष्ट असल्याचे कमाडिंग ऑफिसर कर्नल नछतर सिंग जोहल यांनी सांगितले. मुंबईकरांनी या आशियाई नौकानयन स्पर्धांचा थरार अनुभवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Related Posts
-
रत्नागिरीत पाहायला मिळाला नौका स्पर्धेचा थरार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - रत्नागिरी तालुक्यातील गावडे…
-
कृषी विभागामार्फत गावोगावी राबण्यात येणार बीजप्रक्रिया मोहीम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या…
-
उद्यापासून केडीएमसी क्षेत्रात बूस्टर डोस देण्यात येणार
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - दिनांक 10 जानेवारी 2022…
-
पशुवैद्यकीय पदवीधरांना संधी, कत्तलखान्यांच्या क्षमतेनुसार नेमणूक करण्यात येणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नोंदणीकृत खाजगी पशुवैद्यकीय पदवीधरांची…
-
नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून देता येणार,राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष…
-
आता महामार्गाच्या निर्मितीमध्येही गुंतवणूक करता येणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि…
-
२०२४ मध्ये भाजप सत्तेत येणार नाही - संजय राऊत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - सध्या देशभर…
-
आगामी कल्याण मनपा निवडणुकीत भाजपाची सत्ता येणार- केंद्रीयमंत्री कपिल पाटील
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाविकास आघाडीने दोन वर्षात कल्याण पश्चिम विधानसभा मतदार…
-
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नियमानुसार कडक अंमलबजावणी करण्यात येणार - पालघर जिल्हाधिकारी
प्रतिनिधी . पालघर - पालघर जिल्ह्यामध्ये कोविड -19 विषाणूची बाधा…
-
नवमतदारांच्या जनजागृतीसाठी राज्यभर स्वीप कार्यक्रम राबविण्यात येणार
मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगामार्फत नवमतदारांपर्यंत निवडणूक संदर्भात माहिती पोहोचविण्यासाठी…
-
डिजीलॉकर मध्ये आता आरोग्यविषयक कागदपत्रे डिजिटल पद्धतीने संग्रहित करता येणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - डिजीलॉकर हे इलेक्ट्रॉनिक्स…
-
अहमदनगर आगामी काळात लॉजिस्टिक पार्कचा जिल्हा म्हणून नावारूपास येणार - मंत्री नितीन गडकरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. अहमदनगर/प्रतिनिधी - अहमदनगर जिल्ह्यात केंद्रीय महामार्ग…
-
महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातील कलाकृती आठ दिवसात घेऊन न गेल्यास कलाकारांचा हक्क संपुष्टात येणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या कला संचालनालयाच्या मुंबई…
-
लोकसभेला दिव्यांग व वृध्द मतदारांना घरातूनच करता येणार मतदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी…
-
२२ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार
मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत…