नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – चीनमधील चेंगडू येथे होणाऱ्या आगामी जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या एसएआयच्या नॅशनल सेंटर्स ऑफ एक्सलन्स (NCOEs) च्या चार तलवारबाजीपटूंना भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) आर्थिक मदत करणार आहे. यामध्ये अभय कृष्णा शिंदे (NCOE पटियाला आणि टॉप्स खेळाडू), दुर्गेश मिलिंद जहागीरदार (NCOE औरंगाबाद आणि खेलो इंडिया खेळाडू) आणि NCOE पटियालाच्या खेळाडू तन्नू गुलिया आणि शिक्षा बल्लोरिया यांचा समावेश आहे.
तलवारबाजीच्या वार्षिक कॅलेंडर फॉर ट्रेनिंग अँड कॉम्पिटिशन (ACTC) योजनेंतर्गत हा कार्यक्रम समाविष्ट नसल्यामुळे, जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रदर्शनाची ज्यादा संधी मिळणार आहे. त्यामुळे भारतीय क्रीडा प्राधिकरणाने या खेळाडूंना विशेष बाब म्हणून हा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेची 31 वी आवृत्ती 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या इतर NCOE खेळाडूंमध्ये NCOE बेंगळुरूचा खेळाडू हरदीप (रेस वॉकिंग) आणि ख्याती (उंच उडी), NCOE त्रिवेंद्रमचे तायक्वांदो खेळाडू शिवांगी चनांबम आणि परसीदा नोंगमाइथेम तसेच NCOE इटानगर येथील वुशू खेळाडू सनमा ब्रह्मा यांच्यासह इतर अनेक खेळाडूंचा समावेश आहे