महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे ताज्या घडामोडी

ठाणे मिलेट महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

नेशन न्यूज मराठी टिम.

ठाणे/प्रतिनिधी– बदलत्या काळात सुदृढ आरोग्यासाठी आहारात तृणधान्यांचा वापर वाढविण्यसाठी राज्यात चांगले काम सुरू आहे. यामुळे तृणधान्यांवर (मिलेट) प्रक्रिया करून तयार केलेल्या पदार्थांचे उत्पादन वाढले आहे. उत्पादन वाढीबरोबरच या पदार्थांच्या विक्रीसाठी मार्केटिंगवर उद्योजकांनी भर द्यावा, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी आज येथे केले. 

 आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने केंद्र शासनाच्या अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय व राज्य शासनाच्या कृषी विभागांतर्गत असलेल्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय “मिलेट महोत्सव”चे उद्घाटन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या हस्ते आज डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. 

 यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कृषी आयुक्तालयाचे संचालक (कृषी प्रक्रिया व नियोजन) सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.दीपक कुटे, विभागीय कृषी कार्यालयातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बालाजी ताटे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापक अस्मिता मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. 

    या महोत्सवाच्या निमित्ताने तृणधान्यांपासून बनविलेल्या पदार्थांचे 20 स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलला कृषी आयुक्त .चव्हाण व जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनी भेट दिली. यावेळी कलारंग संस्थेच्या कलाकारांनी पौष्टिक पदार्थांचे महत्व सांगणाऱ्या पथनाट्याचे सादरीकरण केले. नाचणी पिकासंबंधी माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेचेही अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले.

  चव्हाण म्हणाले की, संयुक्त राष्ट्र संघटनेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मागणीनुसार यंदाचे वर्ष “आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष” म्हणून जाहीर केले आहे. यांतर्गत तृणधान्याचे उत्पादन वाढविणे, त्याच्या पदार्थांचे आहारातील प्रमाण वाढविणे यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. तृणधान्याच्या वापर व उत्पादन वाढीसाठी महाराष्ट्रातही या वर्षभरात सुमारे 31 हजार कार्यक्रम घेण्यात आले. विविध माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. या वर्षभरात राबविलेल्या कार्यक्रमांमुळे तृणधान्याचे आहारातील प्रमाण वाढले आहे का, याचे विश्लेषण कृषी विभागामार्फत करण्यात येणार आहे. वातावरणातील बदलामुळे आपल्या आरोग्यातही बदल होत आहेत. सुदृढ आरोग्यासाठी फास्टफूड सोडून पौष्टिक पदार्थांकडे येण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. 

     वर्षभरात केलेल्या जनजागृती, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या सहाय्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात तृणधान्यावरील प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे उत्पादन वाढले आहे.  मात्र, फक्त उत्पादन वाढून उपयोग नसून या उत्पादनाला चांगला बाजार मिळावे, यासाठी मार्केटिंग करण्याची आवश्यकता आहे. यासाठी कृषी विभागाच्या वतीने मार्केटिंग विषयातील तज्ज्ञांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. उत्पादकांनीही मार्केटिंगवर भर द्यावा. येत्या दिवाळीत मिलेटच्या पौष्टिक पदार्थांची भेट नातेवाईकांना देण्यासाठी पुढाकार घ्यावा. यातून येणारी दिवाळी ही मिलेटयुक्त दिवाळी होईल, असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी केले. 

      जिल्हाधिकारी श्री. शिनगारे म्हणाले की, आज आपले जीवन हे धावपळीचे झाले आहे. जीवनमान बदलले आहे. त्यामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम झाला असून जीवनशैलीशी निगडीत आजारांमध्ये वाढ झाली आहे. या आजारांवर मात करायची असेल तर पौष्टिक अन्न अर्थात तृणधान्याच्या पदार्थांचा आहारात समावेश होणे आवश्यक आहे. ठाणे जिल्ह्यात तृणधान्याचे क्षेत्र वाढण्यासाठी तसेच त्यावरील प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी “एक जिल्हा एक उत्पादन” या योजनेत तृणधान्याचा समावेश ठाणे जिल्ह्यासाठी करण्यात आला आहे. जिल्ह्यात तृणधान्याचे क्षेत्र 30 टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यात 37 टक्के क्षेत्रावर तृणधान्य घेण्यात येत आहे. तृणधान्याच्या पदार्थ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. तृणधान्य पदार्थावरील प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी जास्तीत जास्त प्रस्ताव पाठवावेत.  ठाणे जिल्ह्यातून आलेले हे प्रस्ताव मंजूरीसाठी कृषी विभागाने विशेष सहकार्य करावे.

यावेळी श्री. भामरे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती दिली. या योजनेतून महाराष्ट्रात दहा हजार प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आले आहेत.

तसेच एकूण 45 क्लस्टर तयार करण्यात आले असल्याचे सांगितले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना संपूर्णपणे  ऑनलाईन असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी आहे. ठाणे जिल्ह्यातील नागली, वरई उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन उद्योग सुरू करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

      या कार्यक्रमात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना कार्यशाळा, मिलेट पाककृती स्पर्धा, मिलेट पोषण व आरोग्य माहिती, मिलेट खरेदीदार व विक्रेते संमेलन आदी उपक्रम आयोजित करण्यात आले. या उपक्रमांना शेतकरी, प्रक्रिया उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून उत्तम प्रतिसाद दिला. 

    जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी केलेल्या प्रास्ताविकात जिल्ह्यात राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तर विभागीय कृषी कार्यालयातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बालाजी ताटे यांनी आभार मानले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »