नेशन न्यूज मराठी टीम.
लातूर / प्रतिनिधी – मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लातूर जिल्हा प्रशसनाच्यावतीने आयोजित ‘मराठवाडा मॅरेथॉन लातूर २०२३’ उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिला गटात पुष्पा राठोड, तर पुरुष गटात आदित्य पवार या मॅरेथॉनचा विजेता ठरला. प्रारंभी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून मॅरेथॉनला सुरुवात झाली.
‘रन फॉर हुतात्मा, रन फॉर मराठवाडा’ हे घोषवाक्य असलेल्या या मॅरेथॉनमध्ये लातूरकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. युवक, खेळाडूंसह विद्यार्थी, महिला, शासकीय अधिकारी व कर्मचारी या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. नवीन जिल्हाधिकारी कार्यालयांच्या प्रांगणातून सुरू झालेली ही मॅरेथॉन पीव्हीआर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर मॅरेथॉनचा समारोप झाला.