नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या रनधुमाळीत सगळेच पक्ष आपल्या पक्षाचा प्रचार फार जोमाने करत आहेत. लोकशाही असलेल्या भारत देशात निवडणुकीच्या काळात वेगळेच वातावरण पाहायला मिळते. राजकीय पक्ष आपण केलेल्या कामांची यादी सांगतात. तसेच आपल्या विरोधकावर आरोपांचा वर्षाव करतात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे कल्याणात प्रचार करण्यात व्यस्त आहेत. कल्याण मतदार संघातून श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) विरोधात वैशाली दरेकर (Vaishali Darekar) अशी लढत होणार आहेत.
खासदार श्रीकांत शिंदे हे कल्याण पूर्व मतदारसंघातील नगरसेवकांसह राजकीय नेते प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. डोंबिवलीत श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेस नगरसेवकांची देखील भेट घेतली होती त्यामुळे राजकीय वर्तुळात सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. याबाबत बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी “लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या समाजाच्या प्रतिष्ठित नागरिकांच्या नगरसेवकांच्या गाठीभेटी सुरू आहेत. निवडणुकीचा प्रचार करतोय नेहमीप्रमाणे विविध प्रतिष्ठित नागरिकांच्या मी स्वतः भेटी घेत असतो. निवडणुकीत नागरिकांना भेटणं ही एक परंपरा आहे. गेल्यावेळी आलो होतो आता यायला पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांची देखील असते. यंदा सगळीकडे जास्त उत्साह आहे. आमचं कामच आहे सगळ्यांना भेटणं, तसेच विरोधकांची ही भेट घेणे. भेटल्यामुळे बोलण्यामुळे प्रश्न मार्गी लागतात आणि आपण आपलं काम त्यांना सांगायचं काम करायचं त्यातून काही लोकं प्रभावित होतात. त्याचा फायदा आपल्याला मिळत असतो अस श्रीकांत शिंदे यांनी सांगीतले