नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सर्वच पक्ष आपला प्रचार करत आहेत. परंतु जनता सुज्ञ आहे, आपल्या समस्या समजून घेणाऱ्या आणि त्यावर काम करणाऱ्या उमेदवाराला ती मत देईल की प्रवाहाबरोबर जाईल हे महत्वाचे ठरणार आहे. भिवंडी-कल्याणमधील मुस्लिम मतदारांमुळे हा मतदार संघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र सुरेश म्हात्रे उर्फ बाळया मामाला दिलेला शब्द शरद पवार यांनी पाळला. जिजाऊचे निलेश सांबरे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. भिवंडी लोकसभा मतदार संघात भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, शहापूर,कल्याण पश्चिम,भिवंडी ग्रामीण आणि कल्याण पश्चिम असे सहा मतदार संघ येतात.
भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना बदलापुरात मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बदलापुरात सुरू असलेल्या सांबरे यांच्या प्रचाराच्या वेळी येथील सोसायटी रहिवाशी संकुले तसेच ग्रामीण भागातील ग्रामस्थ या संगळ्यांनीच निलेश सांबरे यांचे स्वागत केले. गेल्या दहा वर्षात बदलापुरात खासदारांकडून झालेल्या कामांबद्दल नाराजगी बाळगत यंदा आम्हाला बदल हवाय अशा प्रकारच्या प्रतिक्रिया बदलापूरकर देत आहेत.
निलेश सांबरे हे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून 2008 पासून ठाणे जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसह कोकण परिसरात मुख्य प्रवाहात कार्य करत आहेत. यावेळी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य रोजगार शेती महिला सक्षमीकरण यांसारख्या विविध क्षेत्रातील कामे ते मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत. यावेळी त्यांनी आपल्या सामाजिक कामाच्या बळावर कार्यकर्ते व पदाधिकारी यांची देखील मोठी फळी उभी केली असून या माध्यमातून त्यांना मतदार संघात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आम्हाला परिवर्तन हवे असून त्याकरिता आम्हा बदलापूरकरांच्या समस्या सोडवण्यासाठी एक भक्कम ब्लू प्रिंट असणाऱ्या उमेदवारालाच आम्ही निवडून असे मत मतदारांनी व्यक्त केले. निलेश सांबरे यांना विशेष पसंती मिळत आहे. यावेळी त्यांना राष्ट्रीय रिपब्लिकन ठाकरे गटाकडून देखील पाठिंबा देण्यात आल्याचे पक्षाचे अध्यक्ष ॲड. दिनेश ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
निलेश सांबरे यांनी केलेल्या समाज कार्यामुळे त्यांना ठाणे जिल्ह्यातील जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. पण गेल्या कित्येक वर्षात बदलापुरात खासदारांकडून न केलेल्या कामांमुळे तेथील जनता नाराज आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदार कोणाला विजयी करणार याचे चित्र स्पष्ट झाले आहे.