नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी -संपूर्ण देशात लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरू आहे.सर्वच राजकीय पक्ष्यानी प्रचारासाठी मोठा जोर लावला आहे. त्यात उमेदवार आपण निवडून यावे यासाठी प्रचाराच्या वेगवेगळ्या युक्ता शोधून प्रचार करत आहेत.मतदारांना आपल्याकडे आकर्षित करीत आहे. त्यातच मतदानाचा टक्केवारी वाढावी म्हणून प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.निवडणुकीच्या पाचव्या टप्यात कल्याण मतदार संघात मतदान होणार असून निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती व्हावी यासाठी स्वीप अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
मतदान जनजागृतीसाठी स्वीपने आयोजित केलेल्या रॅलीमध्ये शाळा व महाविद्यालयांचे शिक्षक,पोलिस अधिकारी/कर्मचारी आणि बीट मार्शल यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.त्याचप्रमाणे 142 कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघ परिसरातील गावा-गावातील चौकात जाऊन मतदान करण्याविषयी घोषणा देण्यात आल्या आणि मतदान जनजागृतीपर गीत वाजवून मतदान करणेबाबतचा संदेश नागरिकांना देण्यात आला.यावेळी स्वीप टिमचे कर्मचारी समाधान मोरे, विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर,प्रणव देसाई,अदिती पवार,प्रियंका पडवळ,प्रतिक्षा भोईर,भारती डगळे उपस्थित होते.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 24 कल्याण लोकसभा मतदार संघातील,142 कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात मतदार जनजागृतीसाठी,निवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ ठोंबरे आणि अति.सहा.निवडणूक अधिकारी डॉ.स्वाती घोंगडे यांचे मार्गदर्शनाखाली स्वीप पथकातील (मतदार जनजागृतीपथक) महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे यांच्या अधिपत्याखाली मतदारांना मतदानासाठी आवाहन करण्याकरीता तसेच प्रोत्साहित करण्यासाठी "ड" प्रभागक्षेत्र कार्यालय येथून,142 कल्याण पुर्व विधानसभा मतदार संघ परिसरात नागरिकांमध्ये मतदानाचे महत्व पटवून मतदान जनजागृतीसाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.