महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
राजकीय

आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न – ॲड.प्रकाश आंबेडकर

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.

अकोला/प्रतिनिधी – आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आज दिनांक १७ नोव्हेंबर रोजी अकोल्यातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे ओबीसी संवाद बैठक पार पडली. छगन भुजबळांनी जालन्यातील ओबीसी मेळाव्याच्या ठिकाणाहून मनोज जरांगेंना आव्हान देण्याची गरज काय होती? असा सवालही ऍड आंबेडकर यांनी विचारला.

आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न आहे. पण, आम्ही हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी जिल्ह्या जिल्ह्यात बैठका घेऊ. अंबडच्या आजच्या सभेत भुजबळांनी जरांगेंना राजकीय आव्हान देण्याची गरज काय होती? आरक्षणावरून भांडून काय साध्य होणार आहे? आपल्याला एकत्र राज्यातच रहायचं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सुटू शकतो. असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

या बैठकीला प्रकाश आंबेडकर, प्रा. अंजली आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची उपस्थिती होती. या सभेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकरांनी आरक्षणासोबतच शेतमालाला भाव आणि ओबीसी जनगणनेचा प्रश्न महत्वाचा असल्याचं म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×