Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image चर्चेची बातमी बिझनेस

सोलापूरची गोधडी पोहचली सातासुद्रापार,चादरीनंतर सोलापूरी गोधडीचा बाजारात बोलबाला

सोलापूर/अशोक कांबळे– सोलापूर शहर चादरीसाठी प्रसिद्ध असताना याठिकाणी आधुनिक गोधडीचा व्यवसाय उभारी घेत आहे.या गोधडीवर विविध प्रकारचे आकर्षक नक्षीकाम केले असून ग्राहकांच्या पसंतीस या क्विल्ट म्हणजे गोधडी उतरल्या आहेत.या क्विल्टला देश-विदेशातून मागणी होत आहे.या क्विल्टची म्हणजे गोधडीची निर्मिती सोलापूर शहरातील मजरेवाडी भागात राहणाऱ्या पल्लवी भोपळे यांनी केली आहे.

पल्लवी भोपळे या मूळच्या नळदुर्ग येथील असून त्यांचे शिक्षण एम.ए.पर्यंत झाले आहे.लग्नानंतर त्या सोलापूरातील मजरेवाडी भागात स्थायिक झाल्या आहेत.त्यांना भरतकाम व विणकामाची आवड असून कामाच्या व्यापातून त्यांना या छंदाला वेळ देता येत नव्हता.कोरोनामुळे मार्च 2020 मध्ये अचानक लॉकडाऊन झाल्याने त्यांनी आपला वेळ विणकाम व भरतकामांसाठी दिला.त्यांनी या आपल्या कलेला आधुनिकतेची जोड देण्याचा विचार करून त्यासाठी प्रयत्न सुरू केले.पल्लवी यांनी लहानपणी त्यांच्या आजीकडून गोधडी शिवण्याची कला अवगत केली होती.त्याचा फायदा त्यांना या आधुनिक क्विल्ट तयार करण्यासाठी झाला.

देश विदेशात क्विल्ट ला प्रचंड मागणी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यानुसार त्यांनी क्विल्ट कशी बनवतात याचा अभ्यास सुरू केला.त्यांनी शक्कल लढवत बहिणीचा सल्ला घेऊन क्विल्ट बनवायला सुरवात केली.पल्लवी व त्यांची बहीण स्वप्नाली यांनी डिझाइन तयार करून क्विल्ट हाताने किंवा मशीनच्या सहाय्याने तयार करू लागल्या.या गोधडीवर म्हणजे क्विल्टवर आकर्षक व विविध प्रकारचे नक्षीकाम असून त्या मऊ व ऊबदार आहेत.सुरुवातीला त्यांनी या गोधडी नातेवाईक व परिचयातील लोकांना दाखवल्या.त्या त्यांना खूपच आवडल्या.

त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना या आकर्षक व नक्षीदार गोधड्यांचे प्रदर्शन भरवण्याचा सल्ला दिला.त्यानुसार पल्लवी यांनी सोलापूर व पुण्यात गोधड्यांचे प्रदर्शन भरवले.या प्रदर्शनाला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळून 3 हजार 500 रुपयांपासून 8 हजार रुपये किंमतीच्या जवळपास 50 ते 60 गोधड्या विकल्या गेल्या.काही लोकांनी या गोधड्या क्विल्ट खरेदी करून आपल्या नातेवाईकांना देश-विदेशात पाठवून दिल्या.सोलापूरातील पल्लवी व स्वप्नाली या बहिणींनी सुरू केलेला क्विल्टचा व्यवसाय नावारूपाला येत असून सोलापूरच्या चादरी नंतर सोलापूरच्या गोधडीचा ब्रँड तयार झाला आहे.पल्लवी व स्वप्नाली यांनी सुरू केलेल्या व्यवसायाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

पल्लवी भोपळे यांनी बातचीत करताना सांगितले की,विविध कलाकुसर तयार करण्याचा माझा छंद असून या छंदाला कोरोनाच्या काळात व्यावसायिक स्वरूप दिले. या क्विल्टचे मार्केटींग करण्याचे काम माझे पती अश्विनकुमार भोपळे यांनी केले.या गोधडीच्या माध्यमातून अनेक महिलांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळू लागले आहे.यातून महिलांना रोजगार निर्माण झाला आहे.हा व्यवसाय महिलांना सक्षमीकरणाकडे घेऊन जाणारा आहे.सोलापूरातील महिलांनी हातावर शिवलेल्या गोधड्याना देश-विदेशात चांगली मागणी असून ‘व्हीवर बर्ड क्विल्ट’ नावाचा ब्रँड बाजारात नावारूपास येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X