महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image लोकप्रिय बातम्या हिरकणी

कोरोना चाचणीच्या किट निर्मितीत सोलापूरची सुकन्या देतेय योगदान,वर्षभरात सहा युवतींनी मिळून बनवल्या २० लाख कीट

सोलापूर/प्रतिनिधी – देशभरात कोरोना व्हायरसची दुसरी लाट अत्यंत वेगाने पसरत असल्याने कोरोना चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. कोविड-१९ चे जलदगतीने निदान करण्यासंदर्भात आरटी पीसीआर टेस्ट किट वापरले जाते. गेल्या वर्षभरात असे २० लाख किट वडोदरा येथील कंपनीतील सहा तरुणींनी एकत्र येत तयार केले आहेत. सोलापूरची सुकन्या डॉ. स्वप्नाली कुलकर्णी या सहाजणांच्या टीमचे नेतृत्त्व करीत आहेत. कोरोनाच्या लढाईत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सोलापूरच्या या सुकन्येचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

गुजरात येथील वडोदरामध्ये कोसारा डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत हे आरटी पीसीआर किट तयार केले जाते. थोर शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांचे नातू मोहल साराभाई ही कंपनी चालवतात. देशात जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा त्याचे निदान करण्यासाठी लागणारे किट तयार करण्याचे काम कंपनीने हाती घेतले. या कंपनीमधून दररोज चाळीस हजार कीट तयार केल्या जातात. अाज गुजरात, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीसह विविध राज्यांना आरटी-पीसीआरचे किट पुरवठा केले जाते. एप्रिल 2020 मध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यापासून, त्यांनी सुमारे 20 लाख किट पुरविल्या आहेत.

याच कंपनीमध्ये डॉ. स्वप्नाली कुलकर्णी वरिष्ठ व्यवस्थापक तंत्रज्ञ म्हणून या काम करत आहेत. सहा जणांच्या या टीममध्ये त्यांच्यासमवेत, उत्पादन अधिकारी केश पारीख, गुणवत्ता अधिकारी ज्युली ताहिलरामणी, अनुसंधान व विकास अधिकारी जानकी दलवाडी आणि जिनिता वर्गीस आणि गुणवत्ता तपासणी अधिकारी, कीर्ती दोशी या सहा तरुणी देशभरातून मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या कोरोना निदान चाचण्यांच्या किटची पूर्तता करीत आहेत. विशेष म्हणजे या सहाजणी गेल्या वर्षभरात एकही दिवसाची सुट्टी न घेता स्वत:ची काळजी घेऊन काम करत आहेत.

कंपनीचे सीईअो अनुराग मेहता हे या टीमला मार्गदर्शन करत आहेत. डॉ स्वप्नाली कुलकर्णी या मूळच्या सोलापूर शहरातील असून त्यापूर्वी चौपाड येथे राहत होत्या. लग्नानंतर त्या वडोदरा येथे स्थायिक झाल्या. त्यांचे प्राथमिक शिक्षण स.हि.ने. प्रशालेतून तर महाविद्यालयीन शिक्षण दयानंद महाविद्यालयातून पूर्ण केले. वैशंपायन महाविद्यालयातून एमएस्सीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी महाराजा सयाजीराव विद्यापीठातून बायोकेमिस्ट्री या विषयात पीएचडी केली. त्यांचे वडील देविदास वालवडकर हे मार्डी येथील शाळेत मुख्याध्यापक होते तर आई सुचेता या संस्कारवर्ग चालवित होत्या.

आम्ही ऑफिसच्या वेळेचे पालन करत आहोत. प्रत्येकजण तक्रार न करता अतिरिक्त तासातही काम करताहेत. पर्याय उपलब्ध असूनही कुणीही रजेसाठी अर्ज केलेला नाही. ही अशीच वेळ आहे जिथे आम्हाला आपले शिक्षण आणि ज्ञान वापरण्याची संधी मिळाली अाहे. प्रत्येकजण या संकटात योगदान देऊ इच्छित आहे आणि ते कौतुकास्पद आहे. कोसारा कोडायग्नोस्टिकद्वारे विकसित केलेले तंत्रज्ञान वेगवान असून रिअल-टाइममध्ये निकाल देते. किटमध्ये को-प्राइमर तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केल्या आहेत, ज्यामुळे वेग, अचूकता दाखवते. एकदा किट्स तयार झाल्या की ते पाठविण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तपासली जाते असे वरिष्ठ व्यवस्थापक तंत्रज्ञ डॉ. स्वप्नाली कुलकर्णी यांनी सागितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×