महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

नव मतदारांचे गुलाब पुष्प देवून सामाजिक कार्यकर्त्यांनी केले स्वागत

NATION NEWS MARATHI ONLINE.

धुळे/प्रतिनिधी – धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या एल.एम सरदार हायस्कूल येथे मतदारांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला यावेळी प्रथमच मतदान करणार्‍या नव मतदारांचा गुलाब पुष्प देऊन सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. लोकशाहीने दिलेला अधिकार हा आपण पूर्ण करायला हवा अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.नव मतदारांनी जास्त मतदान करण्यासाठी बाहेर पडावे यासाठी हा उपक्रम केल्याची सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले.

तसेच नव मतदारांनी बोलताना सांगितले की, भारतीय संविधानाने आपल्याला मतदानाचा हक्क दिला आहे तो आपण बजावलाच पाहिजे. जेणेकरून आपली येणारी पुढील पिढी हिला चांगले शिक्षण चांगले आरोग्य, रोजगार उपलब्ध करून देणारा लोकप्रतिनिधी निवडून देता येईल यासाठी सर्वांनी मतदान करावे असे आवाहन देखील नव मतदारांनी यावेळी केले.

Translate »
×