Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळामुळे आतापर्यंत ४० घरांचे नुकसान

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी – तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सकाळी 11.30 वाजेपर्यंत एकूण 40 घरांचे नुकसान झाले आहे. तसेच 2 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. 31 ठिकाणी झाडे पडली असून 3 शाळांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाली आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका आतापर्यंत वैभववाडी तालुक्याला बसला आहे. वैभववाडी तालुक्यात एकूण 27 घरांचे नुकसान झाले आहे. तर एका ठिकाणी झाड पडले असून 2 शांळांचे, एका स्मशान शेडचे आणि एका शेळीपालन शेडचे नुकसान झाले आहे. एक विद्युतपोलही पडला आहे.

इतर तालुक्यातील नुकसानीची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. दोडामार्ग तालुक्यात 8 झाडे पडली आहेत. सावंतवाडी तालुक्यात 6 ठिकाणी झाडे पडली आहेत. वेंगुर्ला तालुक्यात एका घराचे नुकसान झाले आहे. तर पाच झाडे पडली आहेत. कुडाळ तालुक्यात 2 घरांचे नुकसान झाले असून एका गोठ्याचेही नुकसान झाले आहे. तर 4 ठिकाणी झाडे पडली आहेत. तसेच एका ठिकाणी विद्युत पोलही पडला आहे. मालवण तालुक्यात 2 ठिकाणी झाडे पडली आहेत. तर एका पत्र्याच्या शेडचे नुकसान व एक विद्युत वाहिनीचे नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यात 9 घरांचे, एका गोठ्याचे, एका शाळेचे नुकसान झाले आहे. तीन ठिकाणी झाडे पडली आहेत. देवगड तालुक्यात एका घराचे नुकसान झाले असून 2 ठिकाणी झाडे कोसळली असून एका ठिकाणी विद्युत वाहिनीचे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X