नेशन न्यू मराठी टीम.
भंडारा / प्रतिनिधी – दरवर्षी प्रमाणे यंदाही आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या वतीने दहीहंडीच्या कार्यक्रमाचे भव्यदिव्य असे आयोजन दसरा मैदान येथे करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाला गालबोट लागले असून दहीहंडी फोडताना गोविंदा दहीहंडी बांधलेल्या दोराला लटकल्याने दोर बांधलेला एक लाकडी स्तंभ अचानक कोसळला. त्यामुळे घटनास्थळी एकाच गोंधळ उडाला. लाकडी स्तंभ कोसळून तो उपस्थित गोविंदांच्या अंगावर पडणार तोच पळापळ झाली. मात्र यात ६ गोविंदा जखमी तर १ गोंविदा फ़ैक्चर झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार भोंडेकर यांच्या वतीने आयोजित दहीहांडीच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता. दहीहंडीच्या या कार्यक्रमासाठी ३ दिवसांपासून जय्यत तयारी करणे सुरू होते. दहीहंडी बांधण्यासाठी अंदाजे ५० फुटावर दोर बांधलेला होता. त्यासाठी दोन्ही बाजूंनी लाकडी स्तंभ उभारण्यात आले. मात्र सायंकाळी ८ .३० वाजताच्या सुमारास एक लाकडी स्तंभ अचानक कोसळल्याने या ठिकाणी गोविंदांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कोणतीही काळजी घेण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट होते