नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे / प्रतिनधी – ठाणे जिल्ह्यातील कळवा या ठिकाणी असलेल्या ,ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्यू प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे, आणि विरोधकांनी देखील या प्रकरणी सरकारचा निषेध करण्यासाठी आपली कंबर कसली आहे.
कळवा रुग्णालय येथे झालेल्या रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी आज युवक काँग्रेसने मूक मोर्चा काढला आहे. घटनेचा निषेध करत कळवा रुग्णालयाच्या बाहेर युवक काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी जमून निषेध व्यक्त केला. त्यानंतर रुग्णालयाच्या आवारात मुक मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला. प्रशासनाला जाग यावी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी यासाठी सदरचा मोर्चा काढण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.