नेशन न्यूज मराठी टिम.
मुंबई/प्रतिनिधी – जालना लाठीचार्ज प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहे. सर्व विरोधी पक्षांकडून सरकारच्या राजीनाम्याची मागणी होताना दिसत आहे.मुबईत या प्रकरणी शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे यांच्या कडून मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
जालन्यात शांततेपणे सुरू असलेल्या आंदोलनात दरम्यान घरात घुसून लाठी चार्ज गोळीबार झाल्याची ही बातमी ऐकू येते आहे हे सगळं करणारा कर्ता करविता कोण महाराष्ट्रद्रोही सरकार आहे हिंदूद्रोही सरकार आहे. जे गणपती मध्ये लोकसभेच अधिवेशन घेत आहे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मराठा आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मराठा आंदोलकांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठामपणे उभे आहे हे सरकार आंधळं ,मुक ,बहिर, लाचार सरकार आहे. अशी टिका खा.अरविंद सावंत यानी केली.
मराठा आंदोलकांवर जालना येथे झालेल्या लाठीचाराचा निषेध म्हणून आम्ही येथे मुक आंदोलन करून निषेध व्यक्त करत आहोत पोलिसांवरचा नियंत्रण संपलेला आहे बार्शी येथे आंदोलकांवर लाठी चार्ज वारकऱ्यांवर लाठी चार्ज आणि आता मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज या घटनेची सखोल चौकशी केली पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा देण्याची गरज आहे मागणी यावेळी करण्यात आली.