नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – हिंद महासागरात भारतीय नौदलाने आज बहु-विमानवाहू युद्धनौकांच्या सामर्थ्याचे आणि अरबी समुद्रात 35 हून अधिक विमानांच्या समन्वित तैनातीसह आपल्या प्रचंड सागरी सामर्थ्याचे दर्शन घडवले. नौदलाच्या सामर्थ्याचे हे प्रदर्शन भारताच्या राष्ट्रीय हितांचे रक्षण, प्रादेशिक स्थैर्य राखण्यासाठी आणि सागरी क्षेत्रामध्ये सहकारी भागीदारी वाढवण्याची कटिबद्धता अधोरेखित करते.
हिंद महासागरात आणि त्यापलीकडे सागरी सुरक्षा आणि उर्जा-प्रक्षेपण वाढवण्याच्या भारतीय नौदलाच्या प्रयत्नांमध्ये हा एक महत्त्वपूर्ण टप्पा देखील आहे. या सरावामध्ये आयएनएस विक्रमादित्य आणि स्वदेशी बनावटीच्या आयएनएस विक्रांत या दोन विमानवाहू युद्धनौकां सोबतच विविध जहाजे, पाणबुड्या आणि विमाने यांचा समावेश होता या माध्यमातून सागरी क्षेत्रात भारताचे तांत्रिक कौशल्य प्रदर्शित झाले.
आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांत यांच्या सरावाचा केंद्रबिंदू हा ‘तरंगणारे सार्वभौम हवाई तळ ‘ म्हणून सेवा देण्यासह मिग-29 के लढाऊ विमाने, एमएच 60आर, कामोव, सी किंग, चेतक आणि एएलएच हेलिकॉप्टर विमानांच्या विस्तृत श्रेणीसाठी प्रक्षेपण मंच प्रदान करण्यावर होता. हे फिरते तळ कुठेही ठेवले जाऊ शकतात, यामुळे लवचिकता वाढेल, उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांना वेळेवर प्रतिसाद देता येईल आणि जगभरातील आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी शाश्वत हवाई मोहिमा राबवण्यात येतील. याव्यतिरिक्त, आपल्या मित्रराष्ट्रांना आश्वस्त करते की, भारतीय नौदल या प्रदेशातील आपल्या ‘सामूहिक’ सुरक्षा गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम आणि सज्ज आहे.
दोन विमानवाहू युद्धनौकांचा यशस्वी सराव हा सागरी प्राबल्य राखण्यासाठी समुद्र-आधारित हवाई सामर्थ्याच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे एक शक्तिशाली प्रमाण आहे. भारत आपली सुरक्षा यंत्रणा बळकट करत असल्याने, देशाच्या संरक्षण धोरणाला आकार देण्यासाठी आणि प्रादेशिक स्थैर्याला चालना देण्यासाठी विमानवाहू जहाजांचे महत्त्व सर्वोपरी राहील.
Related Posts
-
नौदलाच्या सेवेत स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका होणार दाखल
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - आत्मनिर्भरता प्रत्यक्षात साकारण्याच्या…
-
स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत पंतप्रधानांच्या हस्ते नौदलाच्या ताफ्यात दाखल
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. केरळ/प्रतिनिधी - भारताच्या संपूर्ण स्वदेशी बनावटीची…
-
भारतीय नौदलाच्या विंध्यगिरी युद्धनौकेचे राष्ट्रपतींच्या उपस्थितीत लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारतीय…
-
नौदलाच्या पूर्व ताफ्यातील जहाजांनी दिली सिंगापूरला भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. सिंगापूर - नौदलाच्या पूर्व ताफ्याचे फ्लॅग…
-
भारतीय नौदलाच्या सेवेत एलएएच आयएनएस ३२४ रुजू
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. विशाखापट्टणम- आयएनएस देगा, विशाखापट्टणम येथे 04 जुलै…
-
ब्राझीलच्या नौदल शिष्टमंडळाने भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाला दिली भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली- ब्राझीलच्या नौदल शिष्टमंडळाने व्हाइस…
-
नौदलाच्या शाळेच्या विद्यार्थिनीने अलास्कातील माऊंट डेनाली शिखर केले सर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई - भारतीय नौदलाचे कमांडर एस…
-
आयएनएएस ३१६ स्क्वाड्रनचा नौदलाच्या ताफ्यात समावेश
नेशन न्युज मराठी नेटवर्क. गोवा- आयएनएएस स्क्वाड्रन 316 या भारतीय…
-
LSAM ९ हा तिसरा एमसीए बार्ज नौदलाच्या सेवेत तैनात
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - आंतरराष्ट्रीय…
-
नौदलाच्या राष्ट्रीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत कल्याणच्या विद्यार्थिनींचा दुसरा क्रमांक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत…
-
युएईच्या नौदलातील एसएमई शिष्टमंडळाची भारतीय नौदलाच्या तळांना भेट
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - कर्नल डॉ.अली सैफ…
-
भारतीय नौदलाच्या १०० दिवसांच्या संकल्प मोहिमेचा यशस्वी समारोप
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाच्या 100 दिवसांच्या…
-
कलवरी वर्गातील ‘वागीर’ ही पाचवी पाणबुडी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय नौदलाची पाचवी आयएनएस…
-
आयएनएस मुरगाव स्टील्थ गाईडेड क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी - आयएनएस मुरगाव (D67), ही भारतीय…
-
भारतीय नौदलाच्या वासंतिक प्रशिक्षणाचा दिक्षांत पथसंचलन समारंभ पडला पार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदल…
-
बहु -प्रणाली ऑपरेटरद्वारा दिल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्म सेवांसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे जारी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केबल टेलिव्हिजन नेटवर्क…