नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक / प्रतिनिधी – केंद्र व राज्य सरकारच्या सरकारी नोकर भरतीची भूमिका पाहिल्यास अनेक क्षेत्रात करार तत्वाने ही भरती होताना दिसत आहे. भारती प्रक्रिया खूपच धीम्या गतीने होत आहे. ह्या नोकर भरतीच्या प्रक्रियेचा परिणाम प्रशासकीय कार्यालयात पहायला मिळत आहे. सामान्य नागरीकांच्या अनेक कामांना दिरंगाई होताना अनुभवास येते. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे देखील अपुऱ्या कर्मचारी संख्येचा फटका स्थानिक रुग्णालयाला झालेला दिसतो.
इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे अपुऱ्या कर्मचारी अभावी व औषध साठा कमी प्रमाणात असल्याने व त्यांचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी येथे येणाऱ्या रुग्णांचे हाल होत असून रुग्णांना तपासणीसाठी आणि औषधे घेण्यासाठी तासनतास ताटकळत उभे रहावे लागत आहे. तरी संबंधित प्रशासनाने तात्काळ येथे कर्मचारी यांची भर्ती करून पुरेसा औषध साठा उपलब्ध करून द्यावा, रुग्णाची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी रुग्ण करत आहेत.