नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान. ज्याच्या फक्त नावानेच कोणताही चित्रपट हीट होतो. पण आता सलमान खान चर्चेत आहे ते त्याच्या घरावर झालेल्या हल्ल्यामुळे. लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खानला सतत मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानावर 14 एप्रिलच्या पहाटे दोन अज्ञात व्यक्तींनी पाच गोळ्या झाडल्या आणि ते पळून गेले. त्या नंतर परिसरात खळबळ उडाली. आरोपींनी सलमानच्या निवासस्थानाच्या खिडकीवर दोन राउंड फायर केले आणि एक राऊंड गॅलेक्सी अपार्टमेंटच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील इमारतीच्या भिंतीवर आदळला. विशेष म्हणजे, शार्पशूटर गेल्या दोन दिवसांपासून परिसराची चाचपणी करत होते आणि पळून जाण्याचा मार्ग त्यांनी आखला होता.
या घटनेत गुन्हे शाखा आरोपींचा शोध घेत होती आणि त्यांना यात यश मिळाले आहे. गुजरात पोलिसांच्या मदतीने गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींना पकडून मुंबईत आणले. गोळीबारातील आरोपींची नावे विकी गुप्ता (24 वर्ष )आणि सागर कुमार पाल (23 वर्ष ) आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर 25 तारखेपर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांच्या मते गुप्तचरांच्या मदतीने त्यांना दोन्ही आरोपींची माहिती मिळाली होती. दोन्ही आरोपी गुजरातमध्ये जाऊन लपले होते. पोलिसांना संशय आला होता की, दोघांकडे शस्त्रे आहेत. गुन्हे शाखेला तेथील स्थानीय अधिकाऱ्यांच्या मदतीने आरोपींना पकडले. आरोपींनी सलमान खानच्या घराची तीन वेळा रेकी केली होती, प्राथमिक तपासात ही बाब समोर आली आहे. या प्रकरणात पोलिस शक्य तितक्या विविध बाजूने तपास करत आहेत.