नेशन न्यूज मराठी टीम.
सोलापूर– सोलापूर येथील शासकीय रुग्णालयातील टीबी आजारामुळे मृत्यू पावलेल्या तरुणाचा मृतदेह याला मुंग्या लागल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे सोलापूर शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा समोर आला. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना हा प्रकार दिसून आला होता.
सोलापुरातील बुधवार पेठ येथील राकेश मोरे या 20 वर्षीय युवकावर मागच्या चार दिवसांपासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये टीबी आजारावर उपचार सुरु होते. मात्र, काल दुपारी साडेतीनच्या दरम्यान राकेश मृत झाल्याची माहिती संबंधित डॉक्टरांनी राकेशच्या नातेवाईकांना दिली, त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना एक धक्कादायक प्रकार आढळून आला.
मृत राकेशच्या संपूर्ण शरीराला मुंग्या लागल्या होत्या, राकेशला लावण्यात आलेल्या ऑक्सिजन मास्कला ही मुंग्या लागल्या होत्या. त्यामुळे राकेशच्या मृत्यूस सिव्हिल हॉस्पिटल मधील डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप राकेशच्या नातेवाईकांनी केलाय, याबाबत दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी पोलिसात जाऊन दाद मागणार असल्याची माहिती राकेशच्या नातेवाईकांनी दिली आहे.