नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एका मंचावर आले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटासोबतच्या युतीबाबत सकारात्मक संकेत दिले होते. वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत घेत माहिती दिली. कि शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीसाठी चर्चा झाल्या त्यात वंचित सकारात्मक असल्याचे त्यांनी सागितले
आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची शिवसेना सोबत युती / आघाडी करण्याबद्दल चर्चा सुरु आहे. या बाबतीत वंचित बहुजन आघाडीच्या बाजुने आम्ही आमचा होकार कळवला आहे. आमच्या वतीने पक्षाचे राज्य कमिटीचे सदस्य महेंद्र रोकडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन व वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुभाष देसाई तसेच त्यांचे काही खासदार यांच्या बरोबर दोन बैठका झाल्या आहेत. त्यात युती संबंधी सकारात्मक चर्चा झाली. अशी माहिती वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी दिली आहे.
त्याच बरोबर शिवसेना नेते सुभाष देसाई हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना येऊन भेटले. त्यांच्यातही दोन बैठका झाल्या असुन युती संबंधी सकारात्मक चर्चा झाली आहे. सध्या या टप्यावर बोलणी झाली आहेत की, आम्ही शिवसेनेला हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे की, वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्र विकास आघाडीचा भाग बनविणार आणि चार पक्षीय आघाडी करून निवडणूक लढवणार की, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे मिळून निवडणुका लढवणार हे स्पष्ट करायला सांगण्यात आले आहे. या बाबतीतला निर्णय त्यांच्याकडून समजला की पुढच्या टप्प्याची चर्चा सुरु होईल.असेही वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी दिली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना सागितले.
युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.