नेशन न्यूज मराठी टिम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महापालिका मुख्यालयातही महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस व आयुक्त दालनातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या समयी उपायुक्त अतुल पाटील, विनय कुलकर्णी, महापालिका सचिव संजय जाधव, कार्यकरी अभियंता प्रशांत भागवत, अनंत मादगुंडी, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, आय प्रभागाच्या सहा.आयुक्त हेमा मुंबरकर, सहा.सुरक्षा अधिकारी किसन जाधव तसेच इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त डोंबिवलीतही परिमंडळ – २ च्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी मानपाडा रोड वरीलछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यासमयी सहा.आयुक्त संजयकुमार कुमावत,भरत पाटील, उद्यान विभागाचे महेश देशपांडे व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.