नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
कल्याण/प्रतिनिधी– शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त कल्याण काळा तलाव परिसरात बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे शिवसेना शिंदे गट व ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन केले.
यावेळी शिंदे गट व ठाकरे गटाचे पदाधिकारी समोरासमोर आले.आमदार विश्वनाथ भोईर यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही आम्हाला बघून आलेत का ?असं विचारलं.यावेळी एकच दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हास्य उमटले होते .तर लगेच ठाकरे गटाचे पदाधिकारी रवींद्र कपोते यांनी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांना जरांगे यांच्या सभेत मजबूत बोला हा असा सल्ला दिला. खेळीमेळीच्या वातावरणात दोन्ही गटाच्या पदाधिकारी एकमेकांना हात मिळवून बाळासाहेबांना अभिवादन केले. एकंदरीतच राज्यभरात अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गट व ठाकरे गट आमने-सामने येत आहेत.पण कल्याणात वेगळेच चित्र पहायला मिळाले.