नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / प्रतिनिधी – गणेश उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकर मानी व नागरिक कोकण आपल्या गावी जात असतात मात्र त्याला जाण्यासाठी बस सेवा मिळत नसल्याने राजकीय लोकांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेत कोकणाला जाणाऱ्या सर्व प्रवाशांच्या मोठ्या प्रमाणात बसची सोय करत त्यांच्या बस कोकणच्या दिशेने रवाना केल्या आहेत.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात कल्याण डोंबिवली परिसरात 580 बस कोकणच्या दिशेने रवाना केल्या असून आज कल्याण पश्चिम येथील यापैकी काही बसेसला आमदार विश्वनाथ भोईर यांनी भगवा झेंडा दाखवत प्रवाशांना शुभेच्छा देत या बसेस कल्याण मधून रवाना केले आहेत.