महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image राजकीय

कोव्हिड काळात भ्रष्टाचारात शिवसेनेने जागतिक रेकॉर्ड केला, बीएमसीचा १०० कोटीचा घोटाळा उघड करणार-किरीट सोमय्या

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – भाजप नेते किरीट सोमैय्या काल डोंबिवलीत भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते .यावेळी बोलताना किरीट सोमैय्या यांनी महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यावर टीका केली .मेळाव्यानंतर बोलताना किरीट सोमैय्या यांनी कोव्हिड काळात भ्रष्टाचारात शिवसेनेने जागतिक रेकॉर्ड केला आहे ,मंत्र्यांचा घोटाळा मी उघडकीस आनला आहे , आता या मंत्र्यांच्या परिचित व्यक्ती आणि एक अधिकारी याच्या कंपनीला मुंबई महापालिकेत कोव्हिड काळात कशा पद्धतीने 100 कोटीचे कोव्हिडं काँट्रॅकक्ट मिळाले हे येत्या मंगळवारी जनतेसमोर ठेवणार आहे तर पुढच्या महिनाभरात आणखी पाच किस्से एम एम आर रिजन मधील महापालिकामधील अधिकारी आणि सत्ताधारी नेत्यामधील पार्टनरशिप लोकांसमोर ठेवणार असल्याचे सांगितले .

नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या समीर वानखेडे जन्मदाखल्याचे जन्मदाखल्याचे कोणतेही पुरावे मुंबई महापालिकेकडे नाही अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यानी महितीच्या अधिकारात दिल्याचे सोमैय्या यांनी सांगीतल पुढे बोलताना,त्यांना कुठून तरी झेरॉक्स मिळाली ती त्यानी दाखवली
महाराष्ट्र मधील जनतेमध्ये उत्सुकता आहे की समीर वानखेडेचे जन्मदाखल्याचे गूढ रहस्य मुंबई चे महापौर ,नवाब मलिक ,आणि मुंबई पालिका आयुक्तांनी जनतेसमोर ठेवावे अस आवाहन सोमैय्या यांनी केलं

एसटी कर्मचाऱ्याच्या संपाबाबत किरीट सोमय्या याना प्रश्न विचारला असता त्यांनी हे सरकार कोमात जातंय याची काळजी आहे अशी टीका केली पुढे बोलताना वीज गायब होतेय ,एसटी कर्मचारी आत्महत्या करतायत ,अनिल परब रोज म्हणतात एसटी सुटली एसटी गावाला निघाली पण एसटी कुठे आहे असा सवाल  किरीट सोमय्या यांनी केला 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×