डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याच्या अशा गणपती उत्सवासाठी आता शिवसेनेच्या वतीने कल्याण व डोंबिवलीतुन 200 मोफत बससेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत . खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने ही बससेवा उपलब्ध करुन देण्यात आली असून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्या वर्गास दिलासा मिळाला आहे. डोंबिवली आणि कल्याण मधील विविध ठिकाणाहून महाड, मंडणगड- दापोली, श्रीवर्धन, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर खारेपाटण, कणकवली, मालवण, देवगड, सावंतवाडी अशा तेरा मार्गांवर बस रवाना झाल्या.कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने चाकरमाणी मेटाकूटीला आला आहे. तसेच कोकणावर अतिवृष्टीने मोठे संकट ओढावले होते. त्यामुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. तर काहींचे उद्योग व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. अशा परिस्थिती आता होऊ घातलेल्या गणेशोत्सवात आपल्या गावाकडे जाण्यासाठी अनेकांना उधार-उसनवारीनं पैसे घ्यावे लागत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मोफत बससेवा उपलब्ध करुन देण्यात आल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.या बससेवमुळे कोकणात जाणाऱ्या भविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- September 8, 2021