नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
डोंबिवली/प्रतिनिधी – उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभेच्या मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली. श्रीकांत शिंदे यांच्यासमोर तगडा उमेदवार द्यावा. सुषमा अंधारे यांना उमेदवारी दिली पाहिजे, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभेचा ठाकरे यांनी आढावा घेतला. या दरम्यान ठाकरे यांनी प्रत्येक शाखेत जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आगामी लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा ही शिवसेना जिंकणार, असा दावा ठाकरे यांनी केला आहे. तसेच विजयी सभेचे ठिकाणी जाहिर केले आहे.
या दरम्यान डोंबिवली शिवसेना ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांनी कल्याण लोकसभेचा उमेदार कोण व्हावा? या विषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कल पाहता सामान्य पदाधिकारी दिला तरी काहीच टेन्शन नाही. सुभाष भोईर आहेत. लोकसभेच्या रिंगणात आम्ही काही पदाधिकाऱ्यांनी सुचविले होते. सुषमा अंधारे यांना द्यावे, हा मतदारसंघ त्यांच्या फेव्हरचा आहे. विरोधकांना जशास तसे उत्तर द्यायला सक्षम आहे. आदित्य ठाकरे हे मोठे नेते आहेत. ठाकरे यांच्या स्वागताला गर्दी जमली नव्हती अशी टीका खासदार शिंदे यांनी केली होती. त्यावर खामकर यांनी सांगितले की, खासदार शिंदे यांच्या डोळ्यावर चामड्याचे चष्मे आहेत. ठाकरे यांच्या स्वागतासाठी कट्टर शिवसैनिक आणि कुठेही विकला न जाणारा होता. जो क्राऊड आला त्याला आवरताना नाकी नऊ आले. अशी माहितीही त्यांनी दिली.