नेशन न्यूज मराठी टीम.
बीड/प्रतिनिधी – बीडच्या मंगरूळ गावातील आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाडू सोनाली तोडकर हिला, महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जाहीर होताच मंगरूळ ग्रामस्थांच्या वतीने सोनालीचा नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
मंगरूळ गावाला कुस्तीची परंपरा आहे. बारा वर्षांच्या परिश्रमानंतर सोनालीला यश मिळाले आहे. बीड जिल्ह्यातील प्रथम पुरस्कार मानकरी म्हणून सोनालीची नोंद झाली आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाडू सोनाली तोडकर हिला राज्य सरकारने शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे.
Related Posts