नेशन न्यूज मराठी टीम.
अहमदनगर/प्रतिनिधी – शिर्डी साईबाबा संस्थानच्या सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी साईबाबा संस्थानच्या साई निवास अतिथीगृह समोर तब्बल दोन तासापासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
साईबाबा संस्थानच्या वतीने शिर्डी पंचक्रोशीतील नागरिकांचा मुला- मुलींसाठी शिर्डीत ज्युनियर आणि सिनियर कॉलेजे चालवले जाते. मात्र गेल्या अनेक वर्षापासुन या कॉलेज मध्ये शिक्षक कमी आहे , ग्रंथालय आहे पण पुस्तके नाही, क्रीडा मैदान नाही. गेल्या अनेक वर्षांना पासुन प्रभारी प्राचार्य असल्याने तातडीने प्राचार्य आणि शिक्षकांची भरती साई संस्थानने करावी , सध्या प्रभारी असलेले प्राचार्या यांची खुर्ची खाली करा आणि नवीन प्राचार्य भरती करावी अशा अनेक मागण्या घेवून साईबाबा संस्थानच्या सिनियर कॉलेजेच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी साई संस्थानच्या साई अतिथीगृह निवास समोर ठिय्या आंदोलन केले आहे.