नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
मुंबई/प्रतिनिधी –लोकसभा निवडणुकी धुमचक्री संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. सर्वच पक्ष प्रचाराच्या कामाला लागलेले चित्र दिसत आहे. त्यात महाराष्ट्रात शिंदें व त्यांचे समर्थक आमदार शिवसेनेतून बाहेर पडून शिवसेनेचे दोन गट पडले. आणि आता लोकसभा निवडणुकीत आपले अस्तित्व टिकविण्या साठी शिवसेनेचे दोन्ही गट प्रयत्न करताना दिसतात. शिवसेनेच्या विभाजनंतर कल्याण लोकसभा मतदार संघाला एक वेगळेच महत्व प्राप्त झालेले दिसत आहे. कारण हा मतदार संघ मुख्यमंत्री याचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचा होता. आणि पुनः कल्याण लोकसभेची उमेदवारी त्यांना महायुतीतून मिळाली आहे. लोकसभेची लढत जरी महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत असली तरी कल्याण लोकसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिंदे गट यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कल्याण मतदार संघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लढणाऱ्या वैशाली दरेकर ,जितेंद्र आव्हाड,राजन विचारे,केदार दिघे ही मंडळी उपस्थित होती. बैठकी नंतर ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यानी पत्रकारांशी संवाद साधला.त्यावेळी त्या म्हणाल्या जितेंद्र आव्हाडांसोबतची बैठक खूप उत्कृष्ट झाली. महायुतीच्या उमेदवारांना हरवायचे आहे आणि मशाल संसदेत पोहोचवायची आहे याच विषयावर चर्चा झाली. आमचे एकच लक्ष्य आहे महायुतीला हरवणे”
पत्रकारांशी बोलताना वैशाली दरेकर आपले विरोधी उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या बाबत म्हणाल्या की “उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर झाली आहे पण ते कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत हे त्यांना विचारा असा टोला यावेळी त्यांनी लगावला. त्या पुढे म्हणाल्या श्रीकांत शिंदे यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही. आमच्या कडून कधीच बोलण्यात आले नव्हते की आदित्य ठाकरे किंवा वरुण सरदेसाई निवडणूक लढवतील.त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कारण या वेळी एक सर्वसामान्य कार्यकर्ती लढणार आहे आणि त्यांना हरविणार आहे. आमचा प्रचार सुरू झालेला आहे आम्ही जनतेच्या गाटीभेटी घेतोय. पुढील प्रचारात महाविकास आघाडीचे सर्व नेते तिथे हजर असतील”असंही सांगितले.
कल्याण लोकसभा निवडणुकीच्या जागेचा तिढा सुटला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कल्याणमधून श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार असणार अशी माहिती दिली. त्यामुळे आता कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर अशी लोकसभेची लढत पाहायला मिळणार आहे.