Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image अर्थसत्ता चर्चेची बातमी

शेअर बाजार गुंतवणूक तज्ज्ञ राकेश झुनझुनवाला यांचे निधन

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई – मध्यमवर्गीयांमध्ये देखील शेअर बाजाराच्या माध्यमातून गुंतवणुकीची आवड निर्माण करणाऱ्या, शेअर बाजाराचे गुंतवणूक तज्ज्ञ राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. राकेश झुनझुनवाला यांना भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळखले जायचे.

शेअर बाजार हा केवळ मोजक्या श्रीमंत लोकांसाठी नसून सर्वसामान्यांनादेखील शेअर बाजारात नियोजनबद्ध गुंतवणूक करून श्रीमंत होता येतं हे झुनझुनवाला यांनी दाखवून दिलं. स्वतः त्यांनी सुद्धा अतिशय कमी पैशाची गुंतवणूक करून आपली या क्षेत्रातली सुरुवात केली होती, आणि गुंतवणुकीचा अभ्यास करून एक उंची गाठली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर बाजारातील प्रख्यात गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाबद्दल यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.ट्वीट संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की, राकेश झुनझुनवाला हे अदम्य साहसी होते. भरभरुन जगणारे, नर्म विनोदी आणि व्यापाराची अत्यंत अचूक समज असणारे असे होते. आर्थिक जगताला त्यांनी दिलेले योगदान हे कधीही पुसून टाकता न येणारे आहे. भारताच्या प्रगतीबाबतही त्यांना अत्यंत कळकळ होती. त्यांचे निधन हे दुःखदायक आहे. त्यांचे कुटुंबीय आणि हितचिंतकांप्रती माझ्या संवेदना आहेत. ओम शांती.

शेअर बाजारातील गुंतवणूक म्हणजे केवळ सट्टा बाजारातली गुंतवणूक नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये या गुंतवणुकीचे मोठे योगदान असते. त्यादृष्टीने झुनझुनवाला यांनी मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना दिशा दाखविली. राकेश झुनझुनवालांनी सुचवलेल्या शेअर्सकडे आणि त्यांच्या सल्ल्याकडे सर्वसामान्य गुंतवणूकदार लक्ष ठेवून असायचे. विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्यासाठी त्यांनी  अकासा एअर ही विमान सेवाही सुरु केली होती. त्यांच्या निधनाने निश्चितपणे गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक हरपला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X