नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक / प्रतिनिधी – देशात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना शासनाने बऱ्याच महत्वाच्याक्षेत्राचे खाजगीकरण केले आहेत. उद्योग व्यापाराच्या खाजगीकरणानंतर आता शासनाने नोकर भरती प्रक्रियेत देखील खाजगीकरणाला सुरुवात केलेली दिसून येते. बहुतांश ठिकाणी खाजगी कंत्राटदाराकडून हि नोकरभरती केली जात आहे. शिवाय हि भरती कंत्राटी पद्धतीने ठराविक काळासाठी असल्याने कामगारांची नोकरी संदर्भातील असुरक्षितता वाढली आहे. याचा निषेध सर्वत्र केला जात आहे. असाच निषेध नाशिक जिल्ह्यात देखील युवकांनी केला आहे.
शासनामार्फत कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येत असल्याने या भरती प्रक्रिये विरोधात शरद पवार गट राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक होत भरती प्रक्रियेच्या जीआरची होळी लावली.येवल्यातील विंचूर चौफुली येथे या कंत्राटी भरती प्रक्रिये विरोधात जोरदार घोषणाबाजी देत जीआरची होळी करण्यात आली आहे.