नेशन न्यूज मराठी टीम.
सांगली/प्रतिनिधी – कंत्राटी भरती वरून ज्या पद्धतीने वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरू होता,त्याचा तो प्रयत्न आणि बुरखा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फाडून टाकला आहे. कंत्राटी भरतीचा जीआर हा महाविकास आघाडीच्या काळात काढण्यात आला होता.शरद पवारांच्या सल्ल्याने त्यांच्या कृपा आशीर्वादाने उद्धव ठाकरेंच्या सहीने काँग्रेसच्या मदतीने हा जीआर काढला होता. त्यांचे हे पितळ सर्व आता उघडे पडणार आहे.शरद पवार आणि त्यांचा नातू हे महाराष्ट्रात फिरून विद्यार्थ्यांमध्ये विष कालवत होते. त्यांचा हा बुरखा फाडून त्यांना फडणवीसांनी चपराक लावल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.ते सांगलीत माध्यमांशी संवाद साधत होते.
यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले,मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्याने प्रयत्न करत आहेत.सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात प्रवाही बैठक घेतलेली आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याच्या तयारीत आमचं सरकार आहे ओबीसीचे आरक्षण सध्या 16% आहे. जर पुन्हा मराठा समाजाला या ओबीसीच्या 16 टक्के मधून आरक्षण दिलं तर मराठा समाजाला काय मिळणार आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना नोकरी बाबत कोणतीही त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही. यूपीएससी एमपीएससीच्या परीक्षा घेतल्या नाहीत. अनेक विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात त्यांनी नुकसान केलं. आता कंत्राटी भरती वरून वातावरण निर्मिती करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. अशा मोर्चांनी वातावरण तयार होत नाही. कंत्राटी भरती वरून ज्या पद्धतीने वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरू होता त्याचा तो प्रयत्न आणि बुरखा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फाडून टाकला आहे.
कंत्राटी भरतीचा जीआर हा महाविकास आघाडीच्या काळात काढण्यात आला होता. शरद पवारांच्या सल्ल्याने त्यांच्या कृपा आशीर्वादाने उद्धव ठाकरेंच्या सहीने काँग्रेसच्या मदतीने हा जीआर काढला होता. त्यांचे हे पितळ सर्व आता उघडं पडला आहे. ते अजून महाराष्ट्रात किती विष घालवण्याचा प्रयत्न करत जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी मधली नेते मंडळी करत आहेत. कंत्राटी भरती प्रकरणात शरद पवार आणि त्यांचा नातू विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विष घालवण्याचा प्रयत्न करत होते. मांजर कितीही दूध डोळे मिटून पिले तर ते सर्वांना दिसते तसे शरद पवार अंडी त्यांचा नातवाचा हेतू आता पुढे आला आहे. शरद पवार संपूर्ण महाराष्ट्रात फिरून भुई बडवून खोटे सांगत होते त्यांचा हा प्रयत्न उघड्यावर पडला आहे.