नेशन न्युज मराठी टीम.
मुंबई– ‘शक्ती फौजदारी कायदे (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०२०’ दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीने सादर केल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत सादर केले. सर्व सदस्यांनी एकमताने विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर विधेयक मंजूर करण्यात आले.
गृहमंत्री श्री.वळसे-पाटील म्हणाले, शक्ती कायदा मजबूत करण्यासाठी संयुक्त समितीने 13 बैठका घेऊन चर्चा केली. वर्तमानपत्रात जाहिरात देऊन सर्वसामान्यांच्या सूचना मागवल्या. प्रशासकीय अधिकारी व महिला संघटनांशी चर्चा करुन हा कायदा तयार केला. कायदा कठोर करण्यासोबतच या कायद्यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे. कायदा तयार होणे ही निरंतर प्रक्रिया आहे, परिस्थितीनुरूप कायद्यात बदल होतात. समाजात महिलांवर अत्याचार होत असताना आपण बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. केवळ तपासात त्रुटी राहिल्या म्हणून, न्यायालयात योग्य बाजू मांडली गेली नाही म्हणून किंवा तांत्रिक बाबींमुळे एखादा दृष्कृत्य केलेला आरोपी सुटत असेल तर हे न्यायाच्या दृष्टीने बरोबर होणार नाही, असेही श्री.वळसे-पाटील यांनी सांगितले.
विधेयकात समितीने केलेल्या महत्त्वाच्या सुधारणा पुढीलप्रमाणे : १) पोलिस अन्वेषणाकरिता डाटा पुरविण्यात कसूर केल्याबाबत इंटरनेट किंवा मोबाईल टेलिफोनी डाटा पुरवठादार यांना तीन महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या साध्या कारावासाची किंवा २५ लाख रु. इतक्या द्रव्य दंडाची किंवा दोन्ही शिक्षा देण्यात येतील. याबाबतीत कलम १७५ क हे नव्याने दाखल करण्यात येत आहे. २) खोटी तक्रार केल्यास किंवा लोकसेवकास विवक्षित अपराधांची खोटी माहिती दिल्याबद्दल तक्रारदार व्यक्तीस एका वर्षापेक्षा कमी नसेल परंतु तीन वर्षाइतकी असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि १ लाख रु. पर्यंत असू शकेल इतक्या द्रव्य दंडाची शिक्षा देण्याचे नवीन कलम १८२ क प्रस्तावित करण्यात आले आहे. याद्वारे लैंगिक अपराधांबाबत खोटी तक्रार केल्यास तक्रारदारास शिक्षा होऊ शकेल. जेणेकरुन खोट्या तक्रारींचे प्रमाण आणि त्यामुळे बेकसूर माणसाची अनावश्यक मानहानी याला आळा बसू शकेल. ३) अॅसीड ॲटॅकच्या संदर्भात कलम ३२६ मध्ये सुधारणा करण्यात येऊन अॅसीड अॅटॅक करणाऱ्या गुन्हेगारास १५ वर्षापेक्षा कमी नसेल परंतु अशा व्यक्तीच्या उर्वरित नैसर्गिक जीवनाच्या काळापर्यंत असू शकेल इतका कारावास आणि द्रव्य दंडाची शिक्षा प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच पिडीत महिलेस अॅसीड अॅटॅकमुळे करावा लागणाऱ्या वैद्यकीय उपचार खर्चामध्ये प्लॅस्टिक सर्जरी व मुखपुर्नरचना यांचा खर्च हा द्रव्यदंडातून भागविला जाईल अशी तरतूद करण्यात आली आहे. ४) महिलेचा विनयभंग करण्याशिवाय संदेशवहनाच्या कोणत्याही साधनाद्वारे (इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल) क्षोभकारी संभाषण करणे किंवा धमकी देणे याबाबत नवीन कलम ३५४ ड प्रस्तावित करण्यात येऊन त्यामधील शिक्षा ही पुरुष, स्त्री किंवा ट्रान्सजेंडर यांनाही देता येईल अशी तरतूद करण्यात आली आहे. ५) बलात्कारासंबंधातील कलम ३७६ मध्ये सुधारणा करण्यात येऊन त्यामध्ये अपराधी व्यक्ती सश्रम कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल किंवा ज्याप्रकरणी अपराधाचे वैशिष्ट्य घोर स्वरुपाचे आहे आणि जेथे पुरेसा निर्णायक पुरावा आहे आणि जरब बसविण्याची शिक्षा देण्याची खात्री होईल अशा प्रकरणी न्यायालय मृत्यूदंड देखिल देईल अशी तरतूद करण्यात आली आहे. ६) फौजदारी प्रक्रियेच्या संहिता कलम १०० मध्ये सुधारणा करण्यात येऊन लैंगिक अपराधाच्या बाबतीत पंच म्हणून दोन लोकसेवक किंवा शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने मान्यता दिलेले दोन सामाजिक कार्यकर्ते पंच म्हणून घेण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. ७) लैंगिक अपराधांच्याबाबतीत फौजदारी प्रक्रियेच्या संहिता १७३ मध्ये सुधारणा करण्यात येऊन पोलिस अन्वेषण हे ज्या दिनांकास खबर नोंदविली होती त्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत पूर्ण करण्यात यावे अशी तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच याप्रकरणी असे अन्वेषण ३० दिवसात पूर्ण करणे शक्य झाले नाही तर संबंधित विशेष पोलिस महानिरिक्षक किंवा पोलिस आयुक्त यांना ही मुदत कारणे नमूद करून आणखी ३० दिवसांपर्यंत वाढवता येईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. ८) फौजदारी प्रक्रियेच्या संहिता कलम ३०९ मध्ये सुधारणा करुन लैंगिक अपराधाच्या बाबतीत न्याय चौकशी ही ३० कामकाजाच्या दिवसात पूर्ण करण्यात येईल अशी तरतूद करण्यात आली आहे. ९) लैंगिक अपराधांच्या बाबतीत खोटी तक्रार करणे किंवा त्याद्वारे एखाद्या व्यक्तीस जाणूनबूजून त्रास देण्याच्या उद्देशाने तक्रार दाखल करणे याबाबतील अटकपूर्व जामिनाची तरतूद लागू असणार नाही अशी मूळ विधेयकात करण्यात आलेली तरतूद विधीज्ञांचे मत तसेच विधेयकावरील आलेल्या हरकती व सूचना लक्षात घेऊन वगळण्याची शिफारस करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. १०) समितीने दोन्ही सभागृहाच्या सदस्यांकडून तसेच जनतेकडून विधेयकाबाबत मागविलेल्या सूचना/सुधारणा तसेच नागपूर, औरंगाबाद व मुंबई येथे महिला संघटना तसेच उच्च न्यायालयाच्या वकिल संघटना आणि संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा सत्र न्यायालयातील वकिल संघटना यांचेशी चर्चा करुन विधेयकात आवश्यक त्या सुधारणा केल्या आहेत.
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, यांचे महिला सबलिकरणातील योगदान व तळमळ विचारात घेता तज्ज्ञ अभिमत जाणून घेतले आहे. विधेयकाचा प्रारुप मसुदा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या श्रीमती अस्वती दोरजे, सह पोलिस आयुक्त, नागपूर यांचेशी देखील विधेयकांतील तरतूदींबाबत विचारविनिमय केला आहे. याव्यतिरिक्त लैंगिक अपराधांच्या बाबतीत गुन्हे अन्वेषण करणारे महानगरांमधील तसेच ग्रामीण विभागातील तपासी पोलिस अधिकारी यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
हा कायदा तयार करण्यासाठी संयुक्त समितीचे सर्व सदस्य, विधीमंडळात कायदा सशक्त होण्यासाठी सूचना देणारे आमदार या सर्वांचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आभार मानले.
Related Posts
-
शक्ती फौजदारी कायदे विधेयक बाबत संयुक्त समितीची बैठक संपन्न
प्रतिनिधी. औरंगाबाद - गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सन 2020…
-
थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक विधानसभेत मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष…
-
शक्ती विधेयकाला बळकटी देणारे महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये विधेयक २०२० मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महिला व बालकांवरील अत्याचार…
-
शिंदे सरकारने विधानसभेत जिंकला विश्वासदर्शक ठराव
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
-
प्रा. आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई उच्च न्यायालयाकडून आज…
-
राष्ट्रीय आपत्तीनिधीतून महाराष्ट्राला ३५५ कोटींचा निधी मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - महाराष्ट्रात आलेल्या पूर…
-
शक्ती कायदा विधेयका मध्ये या असतील तरतूदी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- बलात्कार, ॲसिड हल्ला आणि समाजमाध्यमातून महिला…
-
उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकासकामे नियमाधिन करणाऱ्या अधिनियमात सुधारणा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकास कामे…
-
भारत-इंडोनेशिया समुद्र शक्ती-२३ युद्धसरावाचा समारोप
नेशन न्यूज मराठी टीम नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत-इंडोनेशिया या देशांमधील…
-
मुंबई तसेच इतर महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई महानगरपालिका तसेच अन्य…
-
शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी कल्याणात वंचितचे निवेदन
प्रतिनिधी. कल्याण - शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी केंद्र सरकारने केलेले शेतकरी…
-
5G च्या जलद कार्यान्वयनासाठी 'राईट ऑफ वे' नियमांमध्ये सुधारणा
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी- केंद्रीय दूरसंवाद मंत्री अश्विनी…
-
महाराष्ट्रातल्या तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - विविध क्षेत्रात उल्लेखनीय…
-
यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांच्या नियमावलीत सुधारणा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष…
-
नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक क्षेत्रात ज्या महिला…
-
"केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम १९४४" मध्ये महत्त्वाच्या सुधारणा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - माहिती…
-
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठी भाषा विधेयक मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील स्थानिक प्राधिकरणांच्या कार्यालयीन…
-
नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य केलेल्या…
-
राष्ट्रीय विधी विद्यापीठांना १५० कोटींचा निधी मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य शासनाने मुंबई, औरंगाबाद…
-
मीटर रीडिंग एजन्सीच्या कामात आणखी सुधारणा करा- चंद्रकांत डांगे
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - वीज ग्राहकांना त्यांच्या वीज…
-
मान्यताप्राप्त चालक प्रशिक्षण केंद्राशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा करण्यासंबंधी अधिसूचना जारी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - रस्ते वाहतूक आणि…
-
आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ विधेयक मंजूर
प्रतिनिधी. मुंबई - आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र 2020 च्या विधेयकास…
-
तंत्र शिक्षणातील बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन सुधारणा प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या शिफारशींनुसार केंद्र…
-
पुण्यात भारत - श्रीलंका संयुक्त मित्र शक्ती लष्करी सराव सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. पुणे/प्रतिनिधी - "मित्र शक्ती-2023 सराव"…
-
वृत्तपत्र आणि नियतकालिके नोंदणी विधेयक लोकसभेत मंजूर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - एका ऐतिहासिक…
-
ठाणे जिल्ह्याच्या वार्षिक योजनेसाठी ४७५ कोटींचा निधी मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - ठाणे जिल्ह्यासाठी सन २०२२-२३ या वर्षीच्या…
-
महाराष्ट्रातील पाच नद्यांच्या संवर्धनासाठी ११८३ कोटी रुपये मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्रातील कृष्णा, पंचगंगा, गोदावरी,…
-
अनधिकृत मासेमारीस आळा घालण्यासाठी तसेच मासेमारी नियमनाचे कामकाज प्रभावी करण्यासाठी अधिनियमात सुधारणा
मुंबई/प्रतिनिधी - अनधिकृत मासेमारीस आळा घालण्यासाठी तसेच राज्यातील मासेमारी नियमनाचे…
-
एमपीएससी मार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासन…
-
भारत-फ्रान्स चा 'शक्ती' संयुक्त लष्करी सराव मेघालयात सुरु
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत-फ्रान्स चा…
-
माथाडी व सुरक्षा रक्षक कायदा सुधारणा विधेयकावर पुनर्विचार करण्यासाठी विशेष समिती गठीत
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - गेल्या तीन दिवसापासून…
-
'भारत ड्रोन शक्ती २०२३' या पहिल्यावहिल्या ड्रोन प्रदर्शनाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी -देशातील संरक्षण…
-
सुरक्षित डिजिटल व्यवस्थेसाठी मोबाइल वापरकर्ता संरक्षण विषयक दोन सुधारणा जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - देशात,…
-
अतिरिक्त फी आकारणाऱ्या शाळांवर फौजदारी दाखल करण्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश
नागपूर/प्रतिनिधी - कोरोना काळात शाळा बंद असूनही अतिरिक्त बाबींसाठीचे शुल्क…
-
महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी शक्ती विधेयकास मान्यता
प्रतिनिधी. मुंबई - महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे…
-
जलसंपदा विभागातील मंजूर पदे वर्ग करण्याबाबतच्या आदेशाला स्थगिती वनमंत्र्यांच्या प्रयत्नाने कार्यवाही थांबली
प्रतिनिधी . यवतमाळ - जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा अपु-या असल्या तरी…
-
महिला संघटना, तज्ज्ञ आणि स्वयंसेवी संस्थांना शक्ती फौजदारी कायद्यातील सुधारणांसाठी सूचना करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात लागू असलेल्या लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण…
-
नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात १०० खाटांच्या क्रिटीकल केअर सेंटरसाठी ४० कोटी मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - कोविड 19 साथीच्या आजाराने हे…
-
२७ गावातील पथदिव्यांसाठी रुपये २७.९० कोटी मंजूर,आ. राजू पाटील यांच्या पाठपुराव्याला आले यश
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण ग्रामीण/ प्रतिनिधी - कल्याण…
-
शक्ती कायदा जागृती समितीची स्थापना - विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – महिलांवरील अत्याचाराला आळा बसण्यासाठी तयार…
-
मोहम्मद पैगंबर बिल या सारखे भविष्यात येणारे कायदे धार्मिक राजकारण खोदून काढतील - प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मोहम्मद पैगंबर बिल संसदेत…
-
खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत ६० हजार कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान मंजूर शिक्षण मंत्री यांची माहिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील खाजगी विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबतचा…
-
ऐतिहासिक शक्ती विधेयकासह अधिवेशनात २४ विधेयके मंजूर
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात 24…