Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
चर्चेची बातमी बिझनेस

नाशिकच्या शेतकऱ्याने लढवली शक्कल,एसी पोल्ट्री फार्ममधून घेतोय भरघोस उत्पन्न

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नाशिक/प्रतिनिधी – शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी गेल्या काही वर्ष्यांपासून पशुपालनाकडे वळले आहेत. यात पोल्ट्री फार्म व्यवसाय करणाऱ्यांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. पण मागील काही वर्ष्यात अति उष्णतेमुळे पोल्ट्री व्यवसाय अडचणीत सापडल्याने साठ टक्क्याहून अधिक पोल्ट्री फार्म बंद पडले आहेत. अशातच नाशिकच्या येवला तालुक्यातील बल्लेगाव येथील शेतकऱ्याने पोल्ट्री फार्म व्यवसायात नवा आविष्कार केला आहे. कृष्णदास जमदाडे हे एसी पोल्ट्री फार्मच्या माध्यमातून आज लखपती झाले आहेत. या व्यवसायातून ते वर्षाला भरघोस उत्पन्न मिळवत आहेत.

अल्प भूधारक शेतकरी कृष्णदास जमदाडे यांच्या घरची परिस्थिती एकेकाळी जेमतेमच होती. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून तीन लाख रुपयाचे कर्ज घेत 2006 साली पोल्ट्री (poultry farm) व्यवसायाला सुरुवात केली. कृष्णदास जमदाडे यांनी दीड कोटी खर्च करून 6 हजार स्क्वेअर फुटच्या 4 पोल्ट्री फार्मची उभारणी केली. एका एसी पोल्ट्री फार्मला तब्बल 25 ते 30 लाख रुपये खर्च आला. आज त्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये 30 हजार पक्षी आहेत. यात पोल्ट्री फार्ममध्ये एसी बसवल्यामुळे पक्ष्यांची वाढ चांगली होते. तसेच पक्ष्यांचा मृत्युदरही कमी होतो. ओपन पोल्ट्री फार्मच्या तुलनेत एसी पोल्ट्री फार्ममध्ये दुप्पट नफा होत असल्याने गुंतवणूक केलेला खर्च दोन ते तीन वर्षात वसूल झाल्याचे कृष्णदास जमदाडे यांनी सांगितले. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्यांसाठी आज कृष्णदास जमदाडे हे आदर्श बनले आहेत. एसी पोल्ट्री फार्मचा पर्याय निवडण्याचे आव्हान पोल्ट्री व्यवसायिकांना कृष्णदास जमदाडे करत आहे.

Translate »
X