नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
कल्याण/प्रतिनिधी – टिटवाळा येथील धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला प्रवासी लोकलने उतरून आपल्या घरी जात असताना तिच्यावर एका इसमाने लैंगिक अत्याचार केला आहे. टिटवाळा रेल्वे स्थानकालगत हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रेल्वे पोलिसांनी त्वरित आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न पुनः ऐरणीवर आला आहें. कल्याण रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत.
Related Posts