नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव/प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातून एका गावात मुलींच्या वस्तीगृहातील पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण तेथील काळजीवाहकानेच केल्याचां धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराबाबत बुधवारी सरकार पक्ष तर्फे स्वतः पोलिसांनी फिर्याद दाखल केली असून त्या फिर्यादीवरून काळजीवाहक तसेच काळजीवाहकाला साथ देणाऱ्या त्याची पत्नी वस्तीगृहाच्या अधीक्षका तसेच सचिव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपी अटकेत आहेत. तर पीडित मुलींना बालसुधार गृहात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून या वस्तीगृहातील मुली सुद्धा सुरक्षित नसल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गणेश शिवाजी पंडित असे या मुलींवर अत्याचार करणाऱ्या काळजीवाहकाचे नाव आहे.
एरंडोल तालुक्यातील खडके गावात शासन मान्यतेचे खाजगी संस्थेचे मुलींचे वस्तीगृह आहे. गेल्या जून महिन्यात हे वस्तीगृह बंद पडल्यानंतर या वस्तीगृहात दाखल पाच मुलींना जळगावातील शासकीय मुलींच्या निरीक्षणगृहात दाखल करण्यात आल आहे. या ठिकाणी मुली या ठिकाणच्या वातावरणात रुळल्या विश्वास संपादन झाल्यानंतर या मुलींनी बाल सुधार गृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे खडके येथील वस्तीगृहात दाखल असताना तेथील काळजीवाहकाने लैंगिक अत्याचार केल्या बाबतची माहिती दिली. हे गंभीर प्रकरण समोर आल्यानंतर जळगाव बालकल्याण समितीचे अध्यक्ष यांनी एरंडोल पोलिसांना पत्र दिले होते. त्यानुसार या गंभीर प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेत पोलिसांनी स्वतःच फिर्यादी होऊन एरंडोल पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला. 2022 ते वस्तीगृह बंद होई पर्यंत म्हणजे वर्षभर मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाचही मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा काळजी वाहक गणेश पंडीत याला अटक करण्यात आले आहे. तसेच माहिती असूनही हे प्रकरण लपवून ठेवून गणेश पंडित याला साथ देणारी त्याची पत्नी तसेच वसतिगृहाची अधिक्षिका आणि सचिव यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
गेल्या जून महिन्यात वस्तीगृह बंद पडल्यानंतर त्या ठिकाणी दाखल असलेल्या पाचही मुलींना जळगाव मुलींचे निरीक्षण गृह याठिकाणी दाखल करण्यात आले आहेत, रवानगी करण्यात आली आहे. महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने मुलींचे जबाब घेण्यात आले असून त्यात मुलींनी त्यांच्यावर काळजीवाहक गणेश पंडीत याने अत्याचार केल्याची माहिती दिली आहे. शासनाची मान्यता असलेले सदरची वस्तीगृह हे एका खाजगी संस्थेचे असून ते जून महिन्यात बंद पडले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.