Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ठाणे ताज्या घडामोडी

कल्याणातील बारावे घनकचरा प्रकल्पाला भीषण आग

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पश्चिमेतील बारावे घनकचरा प्रकल्पातील कचऱ्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी कचऱ्याचे ओला आणि सुका कचरा पद्धतीने विलगीकरण केले जाते. भर दुपारी ही आग लागल्याने परिसरात धुर पसरला आहे. सुरुवातीला लागलेल्या थोड्या आगीने हळूहळू रौद्ररूप धारन केले. या आगीत सर्व कचरा जळून खाक झाला. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मागील 15 दिवसात घनकचरा प्रकल्पातील कचऱ्याला दुसऱ्यांदा आग लागण्याची ही घटना आहे.

घनकचरा प्रकल्पात लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास दोन तास लागणार असल्याची शक्यता कल्याण अग्निशमन दलाचे मुख्याधिकारी नामदेव चौधरी यांनी व्यक्त केली आहे. तसेच वाढत चाललेल्या उष्णतेमुळे ही आग लागली असावी असे मत नामदेव चौधरी यांचे आहे. नेमकी आग कशी लागली याचे कारण अजून समोर आलेले नाही.

Translate »
X