प्रतिनिधी.
मुंबई – कांद्याप्रमाणे ज्या पिकांना साठवणुकीची गरज आहे त्यासाठी राज्यभर साठवणूक केंद्र, शीतगृहांची उभारणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कृषी विभागाला दिले. ग्रामीण भागातील लहान शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा उभारण्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढे यावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
राज्य शासन, नाफेड आणि महाएफपीसी यांच्या माध्यमातून देशातील पहिला कांदा साठवणूक व सुविधा प्रकल्प असलेल्या ‘महाओनियन’ प्रकल्पाचा ई-लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, कृषिमंत्री दादाजी भुसे सहभागी झाले होते. यावेळी शिरूर, जुन्नर, वैजापूर, सिन्नर आणि अहमदनगर जिल्ह्यातील वांबोरी येथील साठवणुक प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले, याप्रकल्पाच्या माध्यमातून उद्योग आणि कृषी विभाग हातात हात घालून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एकत्र आले आहेत. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या शेतमालाला हमी भावापेक्षा हमखास भाव मिळाला पाहिजे यासाठी ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेतून शेतकऱ्यांना सुखी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र येऊन कांदा साठवणुकीचे प्रकल्प उभारले आहेत. ज्या पिकांना साठवणुकीची गरज आहे त्यासाठी राज्यभर ठिकठिकाणी उभारणी केंद्र निर्माण केले पाहिजे.
शेतकरी बांधव सर्वस्व पणाला लावून कांदा पिकवतो अशा वेळेला जर त्याला भाव मिळाला नाही तर त्याच्यावर आर्थिक संकट कोसळतं. कधीकधी शेतकऱ्याने पिकविलेल्या सोन्यासारख्या शेतमालाला माती मोल भाव मिळतो. हे थांबविण्यासाठी बाजारात ज्याला मागणी आहे ते पिकविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ ही योजना महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शेतकरी संघटित होणे गरजेचे आहे. विभागवार शेतकरी उत्पादक कंपन्यांनी गटशेतीला प्राधान्य दिले पाहिजे. शेतात राबणारा शेतकरी जगाचा अन्नदाता आहे. त्याला वर्क फ्रॉम होमची सुविधा नाही अशा परिस्थितीत या अन्नदात्याला हमीपेक्षा हमखास भाव मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना कर्जातून बाहेर काढतानाच त्याला स्वावलंबी बनवून त्याच्या सुखासाठी काम करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
‘विकेल ते पिकेल’मुळे शेतकऱ्यांच्या हातात यशाची गुरूकिल्ली- उद्योगमंत्री
उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणाले, ‘विकेल ते पिकेल’या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हातात यशाची गुरूकिल्ली मिळाली आहे. उद्योग आणि कृषि विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी गाळे, साठवणूक केंद्र उभारणी करून दिले जातील. याठिकाणी प्रक्रिया केंद्र निर्माण झाल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी उभारली २१ लाख मेट्रिक टन कांदा साठवणूक क्षमता- कृषिमंत्री
कृषिमंत्री श्री. भुसे म्हणाले, देशाच्या एकूण कांदा उत्पादनाच्या ५० टक्के कांदा देशपातळीवर पुरविण्याचे काम महाराष्ट्रातील शेतकरी बांधव करीत आहेत. राज्यात कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी वैयक्तीक पातळीवर सुमारे २१ लाख मेट्रिक टनाची कांदा साठवणुक क्षमता उभी केली आहे. याकामी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून चांगले काम होत असल्याचे सांगतानाच नाफेड मार्फत कांदा खरेदी करताना बाजारपेठेत जो दर असेल त्याप्रमाणे खरेदी करण्याची आवश्यकता असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल.
कृषी विभागाच्या माध्यमातून विकेल ते पिकेल ही योजना राबवताना त्याला मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची (स्मार्ट) जोड देऊन शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नाफेडचे महाव्यवस्थापक संजीवकुमार चढ्ढा यांनी मनोगत व्यक्त केले. महाएफपीसीचे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास राज्यभरातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनीधी उपस्थित होते.
Related Posts
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा
मुंबई/प्रतिनिधी – दीपोत्सव, प्रकाश पर्व मंगलमय अशा दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव…
-
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिननिमित्त वर्षा निवासस्थानाच्या…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्य संग्रामातील वीरांना अभिवादन
मुंबई/प्रतिनिधी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य…
-
चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिवादन
मुंबई प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा
पंढरपूर/ प्रतिनिधी - पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरु दे. भक्तिरसात,…
-
बीकेसी येथे कोविड१९ रुग्णालयाच्या कामाची मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांची पाहणी
मुंबई - कोरोनाचा सामना करण्यासाठी चीनच्या वुहान शहारात उभारण्यात आलेल्या…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते माध्यम प्रतिनिधींना ‘कोविड योद्धा’ सन्मान
प्रतिनिधी. मुंबई- कोविड-१९ च्या संकटकाळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना…
-
‘लोकराज्य’च्या महापर्यटन विशेषांकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या…
-
सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पाहणी
सांगली/प्रतिनिधी - जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर…
-
दी धारावी मॉडेल पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई प्रतिनिधी – कोरोना रोखण्यात मुंबई महापालिकेने धारावी मॉडेल यशस्वी केले…
-
महाराष्ट्र समृद्धी महामार्गदेशातील सर्वोत्तम महामार्ग ठरेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
प्रतिनिधी. अमरावती- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा देशातील…
-
महा-उत्सव २०२२ चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य शासनाच्या…
-
चैत्यभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा…
-
नववर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबई पोलीस आयुक्तालयाला भेट
प्रतिनिधी. मुंबई - महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तृत्वाला तोड नाही. पोलिसांच्या सूर्यप्रकाशा इतक्या…
-
मंदिरं बंद पण आरोग्यमंदिरं सुरू-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ठाणे/प्रतिनिधी - कोरोनाचा धोका संपलेला नाही. प्रत्येकाने या काळात आपली जबाबदारी…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तिवरे धरणग्रस्तांसाठीच्या २४ घरांचे लोकार्पण
मुंबई/प्रतिनिधी- तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून…
-
केमिकल कंपन्यांनी सुरक्षा उपकरणं लावा अन्यथा टाळे ठोका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा
केमिकल कंपन्यांच्या प्रदूषणाने नागरिक हैराण झाले असून या कंपन्यांनी एकतर…
-
कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधानमंत्र्यांना पत्र
मुंबई/ प्रतिनिधी - राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सिजन वाहतूक करण्याविषयी…
-
मुख्यमंत्री यांच्या सर्वपक्षीय नेत्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीस राज ठाकरे यांची उपस्थिती
प्रतिनिधी. मुंबई - मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद
प्रतिनिधी. मुंबई- जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते,…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्हा परिषद इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन
औरंगाबाद/प्रतिनिधी - येथील जिल्हा परिषद इमारतीचे बांधकाम अद्ययावत, गुणवत्तापूर्ण आणि…
-
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथील विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
नाशिक/प्रतिनिधी - महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांचे संरक्षण करणारे…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते इंडस्ट्रीयल कॉन्क्लेव्ह २०२१ चे उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील प्रादेशिक वैशिष्ट्ये, साधनसामग्रीची उपलब्धता लक्षात घेऊन कोणत्या…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी स्वीकारण्यास…
-
सुरू झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत हा निर्धार ठेवूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई/प्रतिनिधी - आजपासून सुरु झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत…
-
लॉकडाऊन शिथिल करताना विविध क्षेत्रांना गती - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
प्रतिनिधी . मुंबई दि. २४: संकटाच्या काळात राजकारण न करता…
-
राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
प्रतिनिधी. मुंबई -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त…
-
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
DESK MARATHI NEWS ONLINE. नाशिक / प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या काही…
-
‘महायुवा ॲप’चे मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- शासकीय योजना, रोजगार संधी आणि…
-
शिवसेना ठाकरे गटाचे 'होवू द्या चर्चा' अभियान
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - शिवसेना प्रमुख…
-
केंद्र सरकारने माकड चाळे थांबवावेत - राजू शेट्टी
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/aC8Y1-4_z0Q कोल्हापूर / प्रतिनिधी - कांद्याच्या…
-
कल्याणात शिवसेना कार्यकर्त्यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या…
-
निरंकारी संत समागमाला मुख्यमंत्री याची सदिच्छा भेट
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी घेतली भेट
नवी दिल्ली - आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासमवेत…
-
तुर हमिभाव खरेदी केंद्र सुरु करण्याची स्वाभीमानीची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - या वर्षी पाऊस चागला पडल्याने या वर्षी…
-
डोंबिवलीत केंद्र सरकार विरोधात काँग्रसचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - वाढती महागाई आणि बेरोजगारी…
-
केंद्र व राज्य सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - बीडच्या अंबाजोगाईत…
-
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांकडून मदत
प्रतिनिधी. मुंबई - सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांतर्फे कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर…
-
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आयटकची संघर्ष यात्रा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/ifbnhFjFUyE?si=qgXi4-znvb1R0NJW रत्नागिरी/प्रतिनिधी - केंद्र व…
-
कल्याण डोंबिवली मनपा करणार ऑक्सीजन प्लांटची उभारणी
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या कोरोना साथीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत…
-
बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - जळगावात शिवसेना…
-
ठाकरे गटाच्या शिवसेनेची करवसुली कंत्राटच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला / प्रतिनिधी - महापालिका प्रशासनाने…
-
लालबाग सिलेंडर स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत
प्रतिनिधी. मुंबई - लालबाग परिसरातील साराभाई इमारत गॅस सिलेंडर स्फोट…
-
कल्याण मध्ये किरीट सोमय्यांविरोधात ठाकरे गटाच्या महिला आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - भाजप नेते किरीट सोमय्या…