नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
पुणे/प्रतिनिधी – पुण्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस कार्यकर्त्यांची धरपकड करत आहेत.
निखिल वागळे यांच्याकडून पुण्यातील राष्ट्रसेवा दलाच्या सभागृहात ‘निर्भय बनो’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला. विशेष म्हणजे भाजप कार्यकर्ते हा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्नही केला होता. भाजप कार्यकर्ते सभागृहात जाऊन बसले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांची समजूत काढली होती. तर कार्यकर्त्यांनी आपण विचार ऐकायला आलो असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर निदर्शने केली. या सगळ्या प्रकारानंतर आता भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.