नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
पुणे/प्रतिनिधी – २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघात 7 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी शनिवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर तब्बल 46 उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात तीन वेळा लोकसभेच्या सदस्या राहिलेल्या आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे महाविकास आघाडीकडून तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीकडून उभ्या आहेत. पण आता बारामती मतदारसंघात अजून एका उमेदवाराची एंट्री झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत एकच रंगत येणार आहे.
जागतिक दर्जाचे लेखक मा.जिजाऊ यांच्या वंश परंपरेतील आणि बारामती माझे आजोळ आहे असे म्हणणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक लेखक नामदेवराव जाधव यांनीही बारामती मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याशी संवाद साधत असताना त्यांनी असे सांगितले की कमीत-कमी दीड ते दोन लाखाच्या मताधिक्य मला मिळेल.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.