नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
पणजी/प्रतिनिधी – पणजी येथे आयोजित राज्य पतपुरवठ्यासंदर्भातील चर्चासत्रात कृषी आणि ग्रामीण विकास राष्ट्रीय बँकेने (नाबार्ड) 2023-24 या आर्थिक वर्षासाठी गोवा राज्यासाठी 7100 कोटी रुपयांचा पतविषयक अंदाज नोंदवला आहे.हा अंदाज मागील वर्षाच्या तुलनेत 5.80 टक्क्यांनी अधिक आहे.
एकूण अंदाजित संभाव्य पतपुरवठ्यापैकी,1450.00 कोटी रुपये (20.42 टक्के) कृषी आणि संलग्न उपक्रमांसाठी आहेत. एमएसएमई क्षेत्रासाठी 4638.00 कोटी रुपये (65.32 टक्के) संभाव्य पतविषयक आवश्यकता अंदाजित करण्यात आली आहे. तर इतर प्राधान्य क्षेत्रासाठी 1012 कोटी रुपये (14.25 टक्के) संभाव्य पतपुरवठा अपेक्षित आहे.
गोवा आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे राज्य पतपुरवठा चर्चासत्राला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि चर्चासत्राचे अध्यक्ष होते.नाबार्डने प्रकाशित केलेल्या राज्य केंद्रित अभ्यास दस्तऐवजाचे त्यांच्या हस्ते या चर्चासत्रात प्रकाशन करण्यात आले. रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक संचालक स्मिता कुमार, नाबार्डच्या गोवा प्रादेशिक कार्यालयाचे महाव्यवस्थापक / प्रभारी अधिकारी डॉ. मिलिंद भिरुड आणि गोवा सरकारच्या वित्त विभागाचे अतिरिक्त सचिव विकास गावणेकर राज्य केंद्रित दस्तऐवज 2023-24 च्या प्रकाशनात कार्यक्रमात सहभागी झाले होते.
राज्य केंद्रित अभ्यास दस्तऐवज हा राज्य संभाव्य पतविषयक अंदाज तयार करण्यासाठी जिल्हा स्तरावर मूल्यांकन केलेल्या पतपुरवठा संभाव्य अंदाज एकत्रित करून तयार केलेला दस्तऐवज आहे.पतपुरवठा नियोजन दस्तावेज म्हणून यात पतपुरवठ्याचे समावेशन आणि जिल्ह्यांच्या कृषी अर्थव्यवस्थेचे आढावा प्रदान करण्याच्या एकूण अंदाजानुसार क्षेत्रनिहाय, उपक्रमांनुसार मॅपिंग करण्यावर भर देण्यात येतो.
विकासासाठी निधीचे वाटप करण्यास प्राधान्य देण्याच्या दृष्टीने , राज्य केंद्रित अभ्यास दस्तऐवजाच्या माध्यमातून बँकर्स आणि राज्य सरकार यांच्याद्वारे पतपुरवठा आणि पायाभूत सुविधांच्या नियोजनासाठी माहिती पुरवठादार म्हणून काम करणे अपेक्षित आहे.
भारतातील कृषी आणि ग्रामीण व्यवस्था सक्षम, उत्साहवर्धक आणि सशक्त करण्याच्या दिशेने गेल्या चार दशकांतील नाबार्डने दिलेले योगदान, नाबार्डच्या गोवा प्रादेशिक कार्यालयाचे महाव्यवस्थापक / प्रभारी अधिकारी डॉ. मिलिंद भिरुड यांनी अधोरेखित केले. नाबार्डने भागधारकांसोबत सहकार्य केले आहे, बँकिंग प्रणालीशी समन्वय निर्माण केला आहे, विविध सरकारी संस्थांमध्ये सहभाग आहे तसेच पतपुरवठा आणि सहकार्याची ग्रामीण व्यवस्था तयार केली आहे. वित्त पुरवठ्याचे प्रमाण वाढवणे , सवलतीच्या दरात दिल्या जाणाऱ्या कर्जपुरवठ्याचा विस्तार करणे, अन्न प्रक्रिया संस्था, बचत गट आणि किसान क्रेडिट कार्ड सारख्या आर्थिक उत्पादनांची रचना करणारे संयुक्त दायित्व गट, ग्रामीण पायाभूत सुविधा निर्माण करणे, पाणलोट क्षेत्र विकसित , संवर्धित करणे आणि आदिवासींचे जीवनमान वैविध्यपूर्ण करणे आणि बऱ्याच उपक्रमांसाठी नाबार्डने असंख्य उपक्रम हाती घेतले आहेत, असे डॉ. भिरूड यांनी सांगितले.
राज्य पतपुरवठा संदर्भात चर्चासत्र आयोजित केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक संचालक स्मिता कुमार यांनी नाबार्डची प्रशंसा केली. ग्राउंड लेव्हल क्रेडिट (जीएलसी ) वाढवण्याच्या उद्दिष्टासाठी साठी नाबार्डच्या अथक प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.आणि ‘स्वयंपूर्ण गोएम’ चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वतोपरी पाठबळ देण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन गोव्यातील सर्व बँकर्सना केले.
गोवा सरकारच्या वित्त विभागाचे अतिरिक्त सचिव विकास गावणेकर यांनी कृषी उपक्रमांच्या वित्तपुरवठ्यामध्ये सहकार क्षेत्राची भूमिका विशद केली.शेतकर्यांना चांगले उत्पन्न मिळावे या दृष्टीने,शेतकऱ्यांना विशिष्ट उत्पादनांची लागवड करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. पाठबळाचा योग्य वापर करण्यासाठी विविध उपक्रमांसाठीची उपलब्ध अनुदाने तर्कसंगत केली जाऊ शकतात असेही मत त्यांनी मांडले. त्यांनी बँकर्सना 32% च्या जवळपास असलेले सीडी गुणोत्तर सुधारण्याचे आवाहन केले.
नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक सुशील नाईक यांनी 2023-24 या वर्षासाठी संभाव्य उपयुक्त पतपुरवठा संदर्भात सादरीकरण केले. या सादरीकरणाने गोव्यातील प्राधान्य क्षेत्रातील उपक्रमांसाठी क्षेत्रनिहाय निश्चित केलेल्या संभाव्यतेवर प्रकाश टाकला.
Related Posts
-
पणजी येथे सौर-इलेक्ट्रिक हायब्रीड अतिजलद फेरीचा प्रारंभ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी/प्रतिनिधी - केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग…
-
रत्नागिरी येथे कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे आज…
-
पुणे येथे होणार साखर संग्रहालय
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे साखर उद्योगातील स्थान विचारात घेता जागतिक दर्जाचे…
-
डोंबिवलीत वंचितच्या वतीने शांतता रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय…
-
डोंबिवलीत बालभवन येथे गुलाब प्रदर्शनाचे आयोजन
DESK MARATHI NEWS ONLINE. डोंबिवली/प्रतिनिधी- आज पासून डोंबिवलीत भव्य गुलाब…
-
डोंबिवलीत दिलासा फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
प्रतिनिधी. डोंबिवली - कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून…
-
वंबआच्या वतीने मोफत लाॅकडाऊन कोचिंग क्लासेस
प्रतिनिधी. मुंबई - लॉकडाऊन मुळे शाळा बंद आहेत.ऑनलाईन शिक्षण जरी…
-
डोंबिवलीत वंचितच्या वतीने कृषी कायद्याविरोधात निदर्शने
प्रतिनिधी. डोंबिवली - शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी केंद्र सरकारने केलेले शेतकरी…
-
कल्याणात महापरीवाराच्या वतीने वर्षावास समाप्ती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/अशोक कांबळे - कल्याण पूर्व येथे…
-
करमाळा येथे दूधाच्या टँकरला अपघात,चालकाचा मृत्यु
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर /प्रतिनिधी - करमाळा तालुक्यात घोटी…
-
सिन्नर येथे दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे…
-
पोर्ट ट्रस्ट युनियनच्या वतीने २०२१ दिनदर्शिकेचे प्रकाशन
प्रतिनिधी. मुंबई -सालाबादप्रमाणे यावर्षीही मुंबई पोर्ट ट्रस्ट, डॉक अँड जनरल…
-
आयएनएस तरकश गॅबनमधील पोर्ट जेंटिल येथे दाखल
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाची आयएनएस…
-
दिल्ली येथे महाराष्ट्रातील आयसीटीसी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्यातील 191 आयसीटीसी समुपदेशन केंद्र सरकारच्या…
-
शिवसेनेच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम स्तंभाला अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - निझामाच्या तावडीतून मराठी माणसाला…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने दिव्यांग नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी लसीकरण सुरु…
-
पुणे येथे सहाव्या कमांडंट्स बैठकीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - एकात्मिक संरक्षण कर्मचारी…
-
विठ्ठलवाडी येथे १०० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - आध्यात्मिक जागृतीच्या…
-
उदगीर येथे राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर / प्रतिनिधी - शालेय जीवनापासूनच…
-
छत्रपती शिक्षण मंडळाच्या विरोधात आरपीआयच्या वतीने ठिय्या आंदोलन
कल्याण प्रतिनिधी- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सर्व समविचारी पक्ष…
-
स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने निदर्शने
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. वर्धा/प्रतिनिधी - स्मार्ट प्रिपेड मिटरच्या…
-
अमरावतीच्या युवक काँग्रेसच्या वतीने रवी राणा यांच्या विरोधात निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - युवा स्वाभिमान…
-
नेवासा येथे एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचितचा पाठींबा
अहमदनगर/प्रतिनिधी - नेवासा-गेल्या आठ दिवसांपासून राज्यभरात एस .टी .कर्मचाऱ्यांचा संप…
-
इंधन दरवाढी विरोधात खारबाव येथे राष्ट्रवादीचा रास्ता रोको
भिवंडी/प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून केंद्र शासनाकडून दररोज इंधन दरवाढ सुरू…
-
केडीएमसीच्या वतीने अनुकंपपात्र अर्जदारांसाठी मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - शासन निर्णयाच्या…
-
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त केडीएमसीच्या वतीने रॅलीद्वारे जनजागृती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोग नियंत्रणासाठी…
-
नागपूर येथे १९ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विधिमंडळाचे सन २०२२ चे…
-
रांजनगाव येथे इएसआयसी कडून जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - कामगार राज्य विमा महामंडळ…
-
भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त सोलापूर येथे पुस्तकांचे वाटप
सोलापूर - संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले असल्याने त्यांना…
-
कुर्ला बीकेसी येथे पोलिस शिपाई सर्पमित्राने दिले अजगराला जीवदान
मुंबई प्रतिनिधी- कुर्ला बीकेसी येथील सेबी भवन येथे साप असल्याचे…
-
गोवा येथे होणार भारतातील पहिला दीपगृह महोत्सव
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - गोव्याची…
-
शिवसनेच्या वतीने एक हजार पूरग्रस्तांना मदतीचा हात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण शिवसनेतर्फे एक हजार पूरग्रस्तांना अन्नधान्य व जीवनावश्यक…
-
नाशिक मध्ये गल्हाटी धरण संघर्ष समितीच्या वतीने रस्ता रोको
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - अंबड तालुक्यातील…
-
बार्टी मार्फत दिक्षाभूमी येथे ८५ टक्के सवलतीत पुस्तक विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - 67 वा धमचक्र प्रवर्तन…
-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी 'डफडे बजाओ' आंदोलन
नेशन न्यूजमराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे…
-
सकल मराठा समाजाच्या वतीने ठाणे बंदची हाक; पोलिस सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - जालना येथील…
-
राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या प्रारुप मसुद्यावर अभिप्राय पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई - राज्याचे सुधारित महिला धोरण…
-
शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा येथे सापडली ७१६ पुरातन नाणी
प्रतिनिधी . कोल्हापूर - शाहूवाडी तालुक्यातील मौजे अणुस्कुरा येथे जेसीबीच्या…
-
आमदार रोहित पवार यांचा अमळनेर येथे संदेश मेळावा
नेशन न्यूज मराठी टिम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या…
-
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे भरते पोपटांची शाळा
नेशन न्यूज मराठी टीम. गोंदिया / प्रतिनिधी - म्हणतात ना…
-
चांदवड मुंबई आग्रा मार्गावरील चौफुली येथे शेतकऱ्यांचा रस्ता रोको
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - कांदा निर्यात…
-
मोहोळ येथे होणार लवकरच सुसज्ज कोविड केअर सेंटर
सोलापूर/प्रतिनिधी - वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी रुग्णाना योग्य उपचार मिळावे.त्यांच्या…
-
राज्यातील मत्स्यव्यवसाय वाढीसाठी नाबार्ड व केंद्र शासनाबरोबर त्रिपक्षीय करार
प्रतिनिधी. मुंबई - राज्याच्या किनारी भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राबविण्यात…
-
भारतीय हवाई दलातर्फे एव्हीओनिक्सच्या स्वदेशीकरणाविषयी चर्चासत्र
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पुणे - भारतीय हवाई दलाने 18…