धुळे/प्रतिनिधी – हिरे मेडिकलच्या प्रशासनाला वारंवार निवेदन व तक्रारी करूनही उपचारासाठी आलेल्या रुग्णांना सुविधा मिळत नसल्याने स्वाभिमानी पॅंथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हिरे मेडिकल रुग्णालयाच्या महान्जेच धुळे सिव्हील हॉस्पिटलच्या आवारात निदर्शने करत हिरे मेडिकल प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. येत्या पंधरा दिवसाच्या आत रुग्णांना सुविधा न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी पॅंथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हिरे मेडिकलच्या प्रशासनाला दिला आहे.
धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हा सह नंदुरबार ,जळगाव ,नाशिक, येथील रुग्ण उपचारासाठी येत असतात . मात्र अनेक वेळा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने रुग्णांना सुविधा मिळत नसले च्या तक्रारी स्वाभिमानी पॅंथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या होत्या. रुग्णांच्या तक्रारीची दखल घेत स्वाभिमानी पॅंथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हिरे मेडिकलच्या प्रशासनाला जाब विचारला आहे. हिरे मेडिकल प्रशासनाच्या वतीने रुग्णांना योग्य त्या सुविधा पुरविण्यात येतील असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
याप्रसंगी एडवोकेट संतोष जाधव , पवन अहिरे, राहुल वाघ, जितू मोरे, प्रकाश बोरसे, रोहित गायकवाड, उमेश कडरे, नितीन वाघ, कैलास अमृतसागर, जितू पवार, दिनेश चांदणे, राहुल महाले, हिरामण मालचे, करण जाधव, एडवोकेट बापू थोरात यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.