नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – संस्कृती मंत्रालयाने वंदे भारतम नृत्य उत्सव 2023 ही राष्ट्रीय स्तरावरील दोन दिवसीय स्पर्धा (महाअंतिम फेरी) आयोजित केली आहे. नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू मैदानावर 19 डिसेंबर रोजी पहिल्या दिवसाच्या स्पर्धा झाल्या. 20 डिसेंबर रोजी महाअंतिम फेरी आयोजित केली आहे. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत (महाअंतिम फेरी) भाग घेण्यासाठी 980 नर्तकांची निवड करण्यात आली आहे.
महाअंतिम फेरी दरम्यान 20 डिसेंबर 2022 च्या संध्याकाळी एक विशेष कार्यक्रम देखील सादर केला जाणार आहे. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संस्कृती, पर्यटन तसेच ईशान्य प्रदेशाचे केन्द्रीय मंत्री जी. के. रेड्डी, संस्कृती आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, संस्कृती आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी तसेच संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट उपस्थित राहणार आहेत.
प्रजासत्ताक दिन 2023 च्या पार्श्वभूमीवर संस्कृती मंत्रालयाने संरक्षण मंत्रालयाच्या वतीने वंदे भारतम नृत्य उत्सव 2023 या नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. राज्य-केन्द्रशासित प्रदेश, विभाग आणि राष्ट्रीय या तीन पातळीवर ही स्पर्धा घेण्यात येत आहे.
अंतिम फेरीतून निवडलेले 500 नर्तक 2023 च्या प्रजासत्ताक दिनी “नारी शक्ती” संकल्पनेवर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. यासाठी ख्यातनाम नृत्यदिग्दर्शक, संगीतकार, लेखक आणि सर्जनशील रचनाकार यांचा संघ अव्याहतपणे या कामात गर्क आहे.
- महाअंतिम फेरी दरम्यान 20 डिसेंबरच्या संध्याकाळी एक विशेष कार्यक्रम देखील सादर केला जाणार आहे. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि संस्कृती, पर्यटन तसेच ईशान्य प्रदेशाचे केन्द्रीय मंत्री जी. के. रेड्डी उपस्थित राहणार आहेत.
- प्रजासत्ताक दिन 2023 च्या पार्श्वभूमीवर संस्कृती मंत्रालयाने संरक्षण मंत्रालयाच्या वतीने वंदे भारतम नृत्य उत्सव 2023 या नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे.