नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – मुंबई विद्यापीठ क्रीडा विभाग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर विभागीय खो खो महिला स्पर्धा या नुकत्याच पार पडल्या, यात ठाणे विभागाने सर्व विभागावर विजय एकतर्फी मिळवला. त्यानंतर पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धासाठी मुंबई विद्यापीठ महिला संघ घोषित करण्यात आला. या स्पर्धा डॉ. हरित सिंग गौर विश्वविद्यालय, सागर, मध्य प्रदेश येथे होणार आहे. यामध्ये एस एस टी महाविद्यालय उल्हासनगर येथील पाच महिला खेळाडूंची निवड करण्यात आली.
त्यात रेश्मा राठोड, मनोरमा शर्मा, वृतिका सोनावणे, अश्विनी मोरे आणि किशोरी मोकाशी यांची मुंबई विद्यापीठ महिला संघात निवड करण्यात आली आहे. मागील वर्षात मुंबई विद्यापीठ महिला संघ पश्चिम विभागीय स्पर्धेत द्वितीय स्थानावर होता त्यामुळे या वर्षात प्रथम स्थानावरती संघ आला पाहिजे यासाठी मुंबई विद्यापीठ क्रीडा संचालक डॉ मोहन अमृले यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
एस एस टी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरस्वानी, आयक्यूएसी कोऑर्डिनेटर डॉ. खुशबू पुरस्वानी , उपप्राचार्य जीवन विचारे, दिपक गवादे, प्रा तुषार वाकसे तसेच क्रीड़ा संचालक राहुल अकुल, पुष्कर पवार, मार्गदर्शक नरेंद्र मेंगल आणि प्रताप शेलार, सर्व शिक्षक, अन्य कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आणि अंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.