Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
करियर चर्चेची बातमी

महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये जिजाऊ पोलीस अकॅडमीच्या १८८ विध्यार्थ्यांची निवड

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे/संघर्ष गांगुर्डे – नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जिजाऊ अकॅडमीच्या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेऊन तब्बल १८८ विद्यार्थ्यांची रेकॉर्ड ब्रेक निवड झाली आहे. त्यामुळे जिजाऊ संस्थेच्या पोलीस अकॅडमीचे नाव आता सर्वत्रच चर्चेत आले आहे.महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती होण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते . महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून या भरतीसाठी तरुण तरुणी येत असतात . काहींना यश मिळते तर काहींना अपयश . मात्र योग्य मार्गदर्शन आणि प्रमाणिक प्रयत्न केले तर यश मिळवणे फार अवघड नसते . हेच जिजाऊ अकॅडमीच्या पोलीस भरतीत निवड झालेल्या १८८ विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. मोठ्या संख्यने या अकॅडमीतील मुलांची निवड झाल्याने महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात जिजाऊ संस्थेच्या अकॅडमीचे नाव झाले आहे.

ठाणे ,पालघर, कोकणातल्या दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि ते देखील मुख्य प्रवाहात यावेत त्यांची देखील प्रगती व्हावी यासाठी २००८ पासून जिजाऊ शैक्षणिक व समाजिक संस्था ही विविध माध्यमांतून इथल्या मुला मुलींसाठी भविष्यातील करीयरच्या आव्हानांसाठी त्यांनी तयार व्हावे यासाठी मोफत पोलीस अकॅडमी , यूपीएससी / एमपीएससी अकॅडमी , JEE , NEET, स्पर्धा परीक्षा मोफत क्लासेस आदी उपक्रम जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे स्वखर्चाने राबवत आहेत. याचा लाभ या भागांतील असंख्य मुला मुलींनी घेतला आहे. आज येथील अनेक विद्यार्थी विविध स्तरांवर चांगल्या पदांवरती शासकीय सेवा बजावत आहेत .

आजतागायत ५०० शे च्या वर अधिकारी घडले आहेत. तर आयपीस पर्यंत देखील काहींनी मजल मारली आहे हजारोंच्या संख्येने पोलीस भरतीत येथील मुला – मुलींची निवड झाली आहे. तर नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगर पालिकेत विविध जागेसाठी ९१० पदांची भरती प्रक्रिया पार पडली . यात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संचालित जिजाऊ पोलीस सैन्य व अग्निशमन पूर्व प्रशिक्षण केंद्र झडपोली येथून मोफत प्रशिक्षण घेतलेल्या जिजाऊ अकॅडेमीच्या १०४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तर यंदाच्या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जिजाऊ पोलीस अकॅडमीचे १८८ विद्यार्थ्यांनी निवड झाली असून या भरतीमधील रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट दिला आहे.

या भागांतील मुलांनी केवळ शिपाई , कारकून म्हणून नोकरी न करता वेगवेगळ्या उच्च पदांवरती त्यांनी आपला लौकिक मिळवावा . आपल्या मातीतल्या माणसांना योग्य न्याय देण्यासाठी आपल्या मातीतले अधिकारी घडले पाहिजेत. हे ध्येय बाळगून जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे आपल्या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून अहोरात्र काम करत आहेत.
जिजाऊ पोलीस अकॅडमीच्या १८८ विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे निश्चितच कौतुकास्पद आहे . मात्र ही संख्या अजून वाढली पाहिजे केवळ पोलीस भरतीच नाही तर विविध क्षेत्रांत इथल्या मुलांचा नाव लौकिक झाला पाहिजे . अश्या जिद्द असणाऱ्या मुलांसाठी जिजाऊ नेहमीच सोबत असले अश्या भावना यावेळी संस्थापक सांबरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X